
महिला भारत वि. दक्षिण आफ्रिकेमधील दुसरा टी-20 सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला महिला भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अवघ्या 80 धावांवलर ऑल आऊट केलं. भारताकडूना पूजा वस्त्राकर हिने आफ्रिकेच्या डावाला खऱ्या अर्थाने सुरंग लावला. पूजाने 3.1 ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या. तर राधा यादव हिने 3 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं. महिला भारतीय संघाला जिंकण्यासाठी 85 धावांचं आव्हान आहे.
Innings Break!
A fantastic bowling display from #TeamIndia 👏👏
4⃣ wickets for Pooja Vastrakar
3⃣ wickets for Radha YadavA wicket each for Shreyanka Patil, Deepti Sharma & Arundhati Reddy
Chase coming up! ⏳
Scorecard ▶️ https://t.co/NpEloo68KO#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zY2BG3sn2F
— BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2024
महिला भारतीय संघाने सुरूवातीपासून दक्षिण आफ्रिका संघाला बॅकफूटवर ठेवलं होतं. श्रेयांका पाटीलने पहिली विकेट मिळवली त्यानंतर पूजा वस्त्रातर आणि राधा यादवसमोर आफ्रिकेच्या एकाली खेळाडूला मोठी खेळी करत डाव सावरता आला नाही. ताजमिन ब्रिट्स हिने सर्वाधिक 20 धावांची खेळी केली, आफ्रिका संघाच्या सात खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
पूजा वस्त्रातर हिने चार विकेट घेत महिला भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यासोबतच तिने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या 50 विकेटचा टप्पा पूर्ण केला. आजच्या सामन्यात पूजाने तिच्या करियरमधील 3.1- 12-4 सर्वोत्तम प्रदर्शन केलं.
भारताची प्लेइंग इलेव्हन: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), एस सजना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरविंद पाटील, अरविंद राधा यादव.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेके बॉश, ॲने डेर्कसेन, एलिस-मेरी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.