AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Motorola Edge 70 लाँच, डिझाईन आणि परफॉर्मेंन्स जबरदस्त, किंमत किती ?

मोटोरोलाने भारतात त्यांचा नवा प्रीमियम स्मार्टफोन Motorola Edge 70 लाँच केला आहे. हा फोन 1.5K AMOLED डिस्प्ले, Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर, Moto AI फीचर्स आणि 50MP ट्रिपल कॅमरा आदी सुविधांनी सुसज्ज आहे.

Motorola Edge 70 लाँच, डिझाईन आणि परफॉर्मेंन्स जबरदस्त, किंमत किती  ?
Motorola Edge 70 Launch
| Updated on: Dec 16, 2025 | 5:08 PM
Share

Motorola Edge 70 Launch: Motorola ने भारतात त्यांचा नवा स्मार्टफोन Motorola Edge 70 लाँच कला आहे. हा कंपनीच्या Edge सिरीजचा लेटेस्ट आणि प्रीमियम डिव्हाईस आहे. हा फोन त्या युजरना लक्षात ठेवून तयार केला आहे जे स्टाईल, परफॉर्मेंन्स आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी पसंद करतात. नवा Edge 70 ऑनलाईन आणि ऑफ लाईन दोन्ही प्लॅटफॉर्मला उपलब्ध होणार आहे. हा तीन Pantone कलर ऑप्शन्स सादर करण्यात आला आहे असून त्याचा लूक एकदम प्रीमियर आहे.

डिस्प्ले कसा आहे ?

Motorola Edge 70 मध्ये 6.7 इंचाचा 1.5 K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो याला 120Hz रिफ्रेश रेट देतो. हा डिस्प्ले 4,500 निट्सचापीक ब्रायटनेस देतो. HDR10+ आणि डॉल्बी व्हीजन दोन्ही सपोर्ट करतो.त्यामुळे व्हिडीओ पाहणे आणि गेम खेळण्याचा अनुभव खूपच शानदार आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात Gorilla Glass 7i दिला आहे. या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे पाणी आणि धुळीपासून हा फोन बऱ्याच प्रमाणात सुरक्षित आहे. मजबूतीसाठी याला  MIL-STD-810H मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन मिळालेले आहे.

परफॉर्मेंन्स आणि प्रोसेसर?

परफॉर्मेन्सच्या बाबतीत या Motorola Edge 70 लाQualcomm Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर दिलेला आहे, जो वेगवान आणि स्मूथ परफॉर्मेन्स देण्यात सक्षम आहे. या फोनमध्ये 8GB LPDDR5x रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज क्षमता मिळते. ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग दोन्ही सहज होते. या स्मार्टफोन Android 16 वर चालतो. कंपनीने यात त्याला Hello UI दिला आहे.मोटोरोलाने या फोनला तीन मोठे Android अपडेट आणि चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

कॅमेरा कसा आहे ?

Motorola Edge 70 ला ट्रीपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे, जो एक स्क्वेअर शेप कॅमेरा मॉड्युल आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा ऑप्टीकल इमेज स्टेबिलायझेन (OIS)सह दिला आहे. त्यामुळे स्पष्ट आणि स्टेबल फोटो घेण्यास मदत होते. या सोबत 50 मेगा पिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि एक थ्री इन वन लाईट सेंसर देखील दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगला (60fps) सपोर्ट करतो. यात AI Video Enhancement, AI Action Shot आणि Photo Enhancement सारखे फिचर्स आहेत.

बॅटरीची क्षमता

Motorola Edge 70 मध्ये 5,000mAh ची सिलीकॉन कार्बन बॅटरी दिलेली आहे. कंपनीने दावा केला आहे की हा फोन 31 तासांपर्यंत लागोपाट व्हिडीओ प्लेबॅक देण्यात सक्षम आहे. चार्जिंगसाठी यात 68W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट दिलेला आहे.त्यामुळे फोन कमी वेळात चार्ज होतो.

येथे पोस्ट पाहा –

किती आहे किंमत ?

Motorola Edge 70 ची भारतातील किंमत 29,999 रुपये आहे.या स्मार्टफोन केवळ एकाच व्हेरिएंटमध्येच उपलब्ध आहे. ज्यात 8GB रॅम आणि256GB इंटरनल स्टोरेज मिळते. कंपनी निवडक बँक कार्ड्सवर 1,000 रुपयांचे इन्स्टन्ट डिस्काऊंट देखील देत आहे. हा फोन 23 डिसेंबर पासून Flipkart, Motorola India च्या वेबसाईटवर आणि देशभरातील ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर बिक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कलर ऑप्शनचा विचार करता हा फोन Pantone Bronze Green, Pantone Gadget Grey आणि Pantone Lily Pad रंगात मिळत आहे.

डिझाईनचा कशी आहे ?

Motorola Edge 70 मजबूत आणि प्रीमीयम लूकची एयरक्राफ्ट-ग्रेड एल्युमिनियम फ्रेम दिली आहे. फोनची जाडी केवळ 5.99mm आहे आणि याचे वजन 159 ग्रॅम आहे. त्यामुळे हातात पकडायला तो हलका आणि आरामदायक वाटतो. हा फोन 30 हजार रुपयांच्या आत मिड-प्रीमियम सेगमेंटमध्ये एक मजबूत दावेदार बनू शकतो.

ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.