AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी! नॉन क्रिमेलिअरची मर्यादा थेट 15 लाखांवर, 43 नव्या जातींच्या समावेशाची शिफारस

ओबीसींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नॉन क्रिमीलेअर मर्यादा ८ लाखांवरून १५ लाख करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच ओबीसीमध्ये ४३ नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी! नॉन क्रिमेलिअरची मर्यादा थेट 15 लाखांवर, 43 नव्या जातींच्या समावेशाची शिफारस
obc reservationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2026 | 8:29 PM
Share

OBC Reservation : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षण तसेच ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या वेगवेगल्या जातींच्या अनेक समस्यांविषयी बोलले जात आहे. सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे. या सर्व मागण्यांवर ओबीसी आरक्षणविषयक उपसमिती गांभीर्याने काम करत आहे. आज (19 मे) ओबीसी आरक्षणिषयक उपसमितीची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे होते. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उपसमितीने ओबीसींसाठी नॉन क्रिमेलियरची मर्यादा थेट 15 लाख रुपये करावी, अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओबीसीमध्ये आणखी 43 नव्या जातींचा समावेश करावा, अशीही शिफारस या उपसमितीने केली आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे.

उपसमितीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

मिळालेल्या माहितीनुसार ओबीसी आरक्षण विषयक उपसमितीने नॉन क्रिमीलेअर मर्यादा ८ लाखांवरून १५ लाख करण्याची शिफारस केली आहे. तसेच ओबीसीमध्ये ४३ नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचीही शिफारस या उपसमितीने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहेे. या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. याच बैठकीत जात पडताळणीच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णयाचे निर्देश देण्यात आले आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींवरही या बैठकीत सखोल चर्चा झाली आहे. त्यामुळे भविष्यात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक समस्या सोडवल्या जाण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी १० जिल्ह्यांत वसतिगृह

यासह ओबीसी असल्याचे प्रमाणपत्र चुकीच्या लाभार्थ्यांना देऊ नये, हे प्रमाणपत्र वाटप राखावे, अशाही सूचना या उपसमितीत करण्यात आल्या. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १० जिल्ह्यांत वसतिगृह आणि कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, आता या बैठकीत घेण्यात आलेल्या सर्वच निर्णयांवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सखोल चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?