AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apoorva Makhija : मी फक्त रडत होते…व्हायरल किसिंग व्हिडिओवर अपूर्वा मखिजानं सोडलं मौन

Apoorva Makhija : काही दिवसांपूर्वी अपूर्वा मखिजाचा बॉयफ्रेंडला किस करतानाच व्हिडिओ व्हायरल झालेला. यावर आता अपूर्वानं प्रतिक्रिया दिली आहे.

Apoorva Makhija : मी फक्त रडत होते...व्हायरल किसिंग व्हिडिओवर अपूर्वा मखिजानं सोडलं मौन
| Updated on: Oct 07, 2026 | 4:45 PM
Share

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखिजा कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. चाहते तिला ‘द रिबेल किड’ म्हणूनही ओळखतात. अलीकडेच, तिचा आणि तिचा बॉयफ्रेंड अमीन जाझचा एक किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे बरीच खळबळ उडाली. आता, अपूर्वानं व्लॉगमध्ये, या प्रकरणावर मौन सोडलं आहे. अपूर्वा मखिजानं खुलासा केला की, अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ जवळपास एक वर्षापूर्वीचा होता. तिनं हे देखील स्पष्ट केलं की, तो तुर्कीच्या सहलीतील नव्हता. हा व्हिडिओ एका खाजगी पार्टीदरम्यान शूट करण्यात आला होता. त्यावेळी, तिचा आणि अमीन जाझचा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे, याची त्यांना कल्पना नव्हती.

अपूर्वाने स्पष्ट केलं की, काही महिन्यांनंतर, ही खाजगी क्लिप अचानक ऑनलाइन लीक झाली. लोकांनी तिला सर्व प्रकारचे मेसेज पाठवायला सुरुवात केली. अपूर्वा म्हणाली की, ती तुर्कस्तानहून न्यूयॉर्कला परत येत होती आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ती थांबणार होती. जेव्हा विमानाला उशीर झाला, तेव्हा तिनं तिचा फोन तपासला आणि तिला लोकांचे खूप मेसेज आलेले होते. त्यांनी अपूर्वाला व्हायरल व्हिडिओबद्दल विचारलेलं. तो व्हिडिओ पालकांपर्यंत पोहोचलाय, हे समजल्यानंतर अपूर्वा पूर्णपणे खचून गेली.

अपूर्वाने व्लॉगमध्ये पुढे सांगितलं की, ‘माझ्या आई-वडिलांनी तो व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला. माझा बॉयफ्रेंड आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्या क्षणी मी स्वतःवरचा ताबा गमावला होता.’ अपूर्वाने सांगितलं, ‘त्या क्षणी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. मी इतकी घाबरले होते की, लंडनच्या हिथ्रो विमानतळावर जमिनीवर बसून रडू लागले. तिथे कदाचित लाखो लोक असतील आणि मी तिथे नुसती रडतच होते.’

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल अपूर्वा काय म्हणाली?

अपूर्वानं सांगितलं की, लीक झालेल्या व्हिडिओमुळे तिला खूप ट्रोलिंग आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागला. जो क्षण पूर्णपणे खाजगी असायला हवा होता, तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला.

Follow Us
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात