AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा

MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार… रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा

| Updated on: Oct 07, 2026 | 4:20 PM
Share

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली. चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. दरम्यान, रोहित पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसोबत प्रतीकात्मक पुतळ्याच्या सावडण्याच्या विधीमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

MPSC परीक्षांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. याच संदर्भात न्यायालयाने सुनावणी २५ तारखेपर्यंत पुढे ढकलली असून, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूनेच असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणावर चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे. खोटे गुन्हे दाखल करणे किंवा ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करणे हे त्यातीलच एक प्रकार आहे. चित्रा वाघ यांनी या आंदोलनाला नौटंकी म्हणण्याऐवजी, यात सहभागी होऊन गरीब मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि मुख्यमंत्र्यांकडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढावे, असे खडसे यांनी आवाहन केले.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसोबत मुळा-मुठा नदीच्या घाटावर जाऊन त्यांनी प्रतीकात्मक पुतळ्याच्या सावडण्याच्या विधीमध्ये भाग घेतला. MPSC आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी असून, यासाठी ते सात दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

 

 

Published on: Oct 07, 2026 04:19 PM

Follow Us