AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story : सागर रत्ना रेस्टोरेंटमध्ये लंच… त्यानंतर थेट जंतरमंतरकडे कूच, राहुल गांधींचा अचानक प्लान; किती वाजता काय घडलं?

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने दिल्लीतील जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. सागर रत्ना रेस्टॉरंटमधील लंचनंतर अचानकपणे शेकडो खासदारांनी जंतरमंतर गाठले. 'व्होटचोर'च्या घोषणा देत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली.

Special Story : सागर रत्ना रेस्टोरेंटमध्ये लंच... त्यानंतर थेट जंतरमंतरकडे कूच, राहुल गांधींचा अचानक प्लान; किती वाजता काय घडलं?
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 4:57 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काल इंडिया आघाडीने दिल्लीत जोरदार आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जंतरमंतरवर आक्रमक आंदोलन केल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. अचानक शेकडो लोकांनी निदर्शने सुरू केली. व्होटचोर व्होटचोर, ज्ञानेश कुमार व्होटचोरच्या घोषणा देऊन विरोधकांनी संपूर्ण परिसर दणाणू सोडला. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा हे आंदोलक देत आहेत. त्यामुळे दिल्लीतील वातावरण अधिकच तापलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांना जनपथवरील सागर रत्ना रेस्टॉरंटमध्ये बोलावलं होतं. या ठिकाणी सर्व खासदारांनी जेवण केलं. गप्पा मारल्या. या रेस्टॉरंटपासून जंतरमंतर अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर आहे. जंतरमंतरवर आधीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. तसेच या परिसरात BNSS चे कलम 163 लागू करण्यात आलेले आहे. मात्र, त्याला न जुमानता विरोधक हॉटेलमधून बाहेर पडले आणि बसमधून थेट जंतरमंतर गाठले.

खासदारांवर नजर

विरोधी पक्षांच्या खासदारांनी काल आंदोलन केल्यानंतर दिल्ली पोलीस खासदारांच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. विरोधक जंतरमंतरला धडक देण्याचे संकेत मिळत असल्याने पोलिसांनी आधीपासूनच तयारी केली होती. त्यातच जंतरमंतरला खासदारांच्या बसेस आल्या आणि एकच गोंधळ सुरू झाला. बसमधून उतरून खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळ उडाला आणि पोलीसही अलर्ट झाले.

कधी काय घडलं?

4:06 PM : इंडिया आघाडंच्या खासदारांची एक बस जंतरमंतरच्या दिशेने आली. यावेळी मध्येच बस अडवण्यात आली, तेव्हा काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी पोलिसांना सवाल केला. आम्ही खासगी बसमधून प्रवास करत आहोत. आमच्याकडे परमिट आहे. ड्रायव्हरकडे लायसन्स आहे. आम्ही प्रवाशी म्हणून प्रवास करत आहोत. देशातील नागरिकांना प्रवास करण्याचा अधिकार नाहीये का? आम्ही कुठे चाललोय हे सरकारला सांगणं जरूरीचं आहे का? व्यक्तिगत प्रवास करण्यासाठी परमिट घेण्याची गरज आहे का? असा सवाल कार्ति चिदंबरम यांनी पोलिसांना केला.

4:00 PM : मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेली बैठक संपल्यानंतर खासदार जंतरमंतरच्या दिशेने रवाना झाले. एका बसमध्ये खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विरोधी पक्ष नेते होते.

3:50 PM : मल्लिकार्जुन खरगे यांनी या दरम्यान एक्सवर पोस्ट केली. आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतरमंतरवर आंदोलन केलं जाईल. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे, असं खरगे यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

3:40 PM : डेरेक ओ’ब्रायन यांनीही सर्व खासदारांची एकजूट असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही सर्व एकत्र आहोत. कोणत्याही अहंकाराशिवाय आम्ही सर्व या ठिकाणी आलो आहोत. जोपर्यंत बडी शक्ती पराभूत होत नाही, तोपर्यंत विरोधक या शक्ती विरोधात लढत राहतील, असं डेरेक ओ’ब्रायन यांनी म्हटलं.

3:35 PM : राहुल गांधी यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी तिन्ही निवडणूक आयुक्तांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला भेटण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळेच आम्ही जंतरमंतरवर येणार आहोत, असं राहुल गांधी म्हणाले.

आमच्यासाठी ज्ञानेश कुमार हे वैध निवडणूक आयुक्त नाहीत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मोहन भागवत यांच्यावर लोकशाहीचं नुकसान करण्याचा आरोपही त्यांनी लगावला.

दिल्लीत राहुल गांधी आणि इतर खासदारांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या विरोधात आतापर्यंत 45 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. माझ्या विरोधात 100 एफआयआर दाखल व्हावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्यासाठी एफआयआर म्हणजे मेडलच आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?