WhatsApp मध्ये भन्नाट फिचर्स येणार, चॅटींगचा अनुभव बदलणार, सर्वकाही अधिक स्मार्ट होणार
WhatsApp मध्ये आता भन्नाट फिचर्स येऊ घातले आहेत. त्यामुळे तुमचा चॅटींगचा अनुभव अधिक मजेशीर आणि स्मार्ट होणार आहे. चला तर पाहूयात काय आहेत नेमके हे फिचर्स ?

New WhatsApp Feature : जर तुम्ही WhatsApp जर रोज वापर करत असाल तर येत्या काही दिवसात तुमचा चॅटींग आणि कॉलिंगचा अनुभव पू्र्णपणे बदलला जाणार आहे. कंपनीने युजर्ससाठी एक साथ अनेक नवीन फिचर्स रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कॉलिंग पासून ते स्टेटस आणि डेस्कटॉपचा वापर आता पहिल्यापेक्षा अधिक सोपा आणि मजेदार बनणार आहे.
खास बाब म्हणजे काही फिचर्स iPhone सारखे प्रीमीयम एक्सपीरियन्सची झलक देखील देत आहेत. चला तर सोप्या भाषेत समजून घेऊयात की WhatsApp मध्ये कोण-कोणते नवीन फिचर्स येत आहेत आणि हे तुमच्या कसे कामी येणार आहेत.
कॉल सेक्शनमध्ये 3 मोठे बदल
WhatsApp ने कॉल कॅटगरीत तीन नवीन फिचर्स समाविष्ट केले आहेत. ज्यामुळे कॉलिंगचा अनुभव आणखी चांगला होणार आहे. पहिले फिचरचे नाव ‘मिस्ड कॉल मॅसेज’फिचर असे आहे. जर तुम्ही कोणाला कॉल करत असाल आणि समोरची व्यक्ती कॉल उचलत नसेल तर तुम्ही त्याला व्हॉईस व्हिडीओ नोट पाटवू शकणार आहे. यामुळे समोरची व्यक्ती जसे WhatsApp उघडाल तसे एका टॅपमध्ये तुमचा मॅसेज पाहू आणि ऐकू शकतो.
वॉइस चॅटमध्ये रिएक्शन आणि चॅटमध्ये शिफ्ट होण्याची सुविधा
दुसरे नवीन फिचर्स व्हॉईस चॅटशी संबंधित आहे. आता व्हॉईस चॅटच्या दरम्यान युजर्स थेट मॅसेज चॅटमध्ये जाऊ शकतात. एवढेच नाही तर बोलताना रिएक्शन देण्याचा देखील पर्याय मिळणार आहे. यामुळे ग्रुप वा कम्युनिटीमध्ये बातची करणे जास्त सोपे आणि इंटरएक्टीव्ह होणार आहे.
ग्रुप कॉल स्पीकर स्पॉटलाईट फीचर
तिसरे फिचर ‘ग्रुप कॉल स्पीकर स्पॉटलाईट’ आहे. या फिचरच्या मदतीने ग्रुप कॉलच्या दरम्यान हे स्पष्ट दिसेल की या वेळी कोण बोलत आहे. यामुळे मोठ्या ग्रुप कॉल्समध्ये कन्फ्युजन कमी होईल आणि बातचीत जास्त व्यवस्थित पद्धतीने होऊ शकेल.
डेस्कटॉप यूजर्ससाठी नवा मीडिया टॅब
जे लोक WhatsApp ला लॅपटॉप, कॉम्प्युटर वा मॅकबुक वापर करत आहेत. त्यांच्यासाठी नवा मीडिया टॅब आणला गेला आहे. आता युजर्ससाठी एकाच जागी आपल्या सर्व मीडिया फाईल्स, डॉक्युमेंट्स आणि लिक पाहू शकणार आहे. WhatsApp च्या मते या फिचरने Mac, Windows आणि Web वर फाईल शोधणे आणि त्यांच्या सोबत काम करणे पहिल्या पेक्षा जास्त वेग आणि सोपे होणार आहे.
स्टेटस फीचर होणार जास्त मजेदार
WhatsApp स्टेटस पाहणे आणि लावणाऱ्यांना देखील नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. आता युजर्स आपल्या स्टेटसवर प्रश्न विचारू शकतील आणि लोक थेट त्याचे उत्तर देऊ शकणार आहेत. याशिवाय WhatsApp चॅनल्समध्ये देखील प्रश्न विचारण्याचे फिचर जोडले गेले आहे. यामुळे चॅनल एडमिन आपल्या फॉलोअर्सशी चांगल्या प्रकारे जो जोडले जाऊ शकतील आणि कोणत्याही टॉपिकवर रियल टाईम रिस्पॉन्स मिळवू शकणार आहेत.
