TV9 नेटवर्कचा AI² अवॉर्ड्स 2026 सोहळा रंगणार, एआय आणि क्रिएटीव्हिटीच्या संगमाला मिळणार नवी ओळख
भारतातील सर्वात मोठ्या TV9 ने नेटवर्कने AI² Awards 2026 ची घोषणा केली आहे. यात एआय तंत्रावरील आधारित चित्रपटाची स्पर्धा भरवण्यात येणार आहे.

TV9 नेटवर्कने AI² अवॉर्ड्स 2026 ( AI² Awards 2026) ची सुरुवात केली आहे. ही अनोखी मोहिम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिस्टीक इमॅजिनेशनच्या संगमाला पुढे नेत आहे. याचा उद्देश्य चित्रपट निर्मितीत AI टूल्सचा वापर करुन नवीन कहाणी तयार करणे हा आहे. पुरस्कार मिळणारे चित्रपट WITT News9 ग्लोबल समिट 2026 मध्ये नवी दिल्लीत प्रदर्शित केले जाणार आहे, येथे भविष्यातील एआय क्रिएटीव्हीटीवर येथे चर्चालसत्र देखील होणार आहे.
स्टोरी टेलिंग एका नव्या जमान्यात प्रवेश करत आहे. स्क्रिप्टींग, साऊंड डिझाईनपासून व्हिज्युअल्स आणि नेरेटीव्हपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)आता क्रिएटीव्ह प्रोसेसला बदलत आहे. हा कलाकाराची जागा घेत नसून त्याच्या कल्पनेला आणखी जास्त ताकद देत आहे. टेक्नॉलॉजी आणि भावनांच्या या संगमाच्या जमान्यात TV9 नेटवर्कने AI² Awards 2026 ची घोषणा केली आहे. ही अनोखी मोहिम आहे, जी चित्रपट निर्मितीच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिस्टीक इमॅजिनेशनच्या संगमाचा सोहळा साजरा करत आहे.
AI² अवॉर्ड्समध्ये विद्यार्थी, इंडीपेन्डट आर्टीस्ट, नवीन प्रोफेशनल आणि एक्सपीरिमेंट करणारे फिल्ममेकर AI सोबत मिळून नव्या प्रकारच्या व्हिज्युएल कहाण्या सादर करु शकतात. या अवॉर्डचा हेतू नवीन क्रिएटरना उभारणे आणि कहाणी सांगण्याची पद्धत बदलणे हा आहे. मग ती डॉक्युमेंटरी असो की म्युझिक व्हिडीओ, एनीमेशन वा ब्रँडेड कंटेन्ट असो.
या मोहिमेची सर्वात मोठी खासियत म्हणजे आता एआयच्या मदतीने कोणतीही व्यक्ती त्याची कहाणी जगासमोर सादर करु शकते. जसे पूर्वी डिजिटल एडिटींगने फिल्म इंडस्ट्री बदलली होती,तशीच आता एआयची कहाणीची कल्पना आणि प्रेझेटेन्शनला बदलत आहे.
केव्हा पासून होणार रजिस्ट्रेशन
AI² अवॉर्ड्स 2026 च्या रजिस्ट्रेशन 8 डिसेंबर 2025 पासून सुरु होणार आहे आणि 31 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे. प्रत्येक चित्रपटाला अनुभवी फिल्ममेकर्स, टेक एक्सपर्ट आणि क्रिएटीव्ह जुरीद्वारे पाहिले जाणार आहे. जुरी राऊंड मुंबईत फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.
WITT-News9 ग्लोबल समिट 2026
विजेत्यांची घोषणा मार्च 2026 मध्ये WITT-News9 ग्लोबल समिट 2026 मध्ये नवी दिल्लीत होणार आहे. तर निवडलेल्या चित्रपट मीडिया आणि इनोव्हेशन लीडर्स समोर सादर केले जातील. यासोबत एआय आणि क्रिएटीव्हीटीच्या भविष्य यावर एक खास पॅनल डिस्कशन देखील होणार आहे. आर्ट एण्ड अल्गोरिदमच्या या संगमाने AI² अवॉर्ड्स 2026 त्या सर्व लोकांना खुले निमंत्रण देत आहेत. जे चित्रपटाच्या भाषेला नव्या रुपात परिभाषित करु इच्छीत आहेत, जेथे तंत्र कहाणीचा आत्मा संपवत नाही तर त्यास आणि व्यापक करत आहे.
