AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय नाही तर ही अभिनेत्री होणार होती बच्चन कुटुंबाची सून, भर कार्यक्रमात जया बच्चन यांनी केलेला जाहीर उल्लेख

ऐश्वर्या राय नाही तर बॉलिवूडमधील ही अभिनेत्री होणार होती बच्चन कुटुंबाची सून. अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जया बच्चन यांनी केलेली होणार्‍या सुनेची घोषणा.

ऐश्वर्या राय नाही तर ही अभिनेत्री होणार होती बच्चन कुटुंबाची सून, भर कार्यक्रमात जया बच्चन यांनी केलेला जाहीर उल्लेख
| Updated on: May 19, 2026 | 7:25 PM
Share

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या कुटुंबाशी संबंधित एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांनी एका कार्यक्रमात करिश्मा कपूरला होणारी सून असा उल्लेख केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

2002 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यावर आणि कारकिर्दीवर आधारित ‘To Be Or Not To Be: Amitabh Bachchan’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. संपूर्ण बच्चन कुटुंब या कार्यक्रमात उपस्थित होते. या विशेष प्रसंगी जया बच्चन यांनी सर्वांसमोर एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितले की बच्चन आणि नंदा कुटुंब आता आणखी एका कुटुंबाचे स्वागत करत आहे आणि ते म्हणजे कपूर कुटुंब.

करिश्मा कपूरचा होणारी सून म्हणून उल्लेख

व्हायरल होत असलेल्या त्या जुन्या व्हिडीओमध्ये जया बच्चन म्हणताना दिसतात की, बच्चन परिवार आणि नंदा परिवार आता कपूर परिवाराचे स्वागत करत आहेत. रणधीर कपूर, बबिता कपूर आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर. त्यावेळी मंचावर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होते. जया बच्चन यांनी विनोदी अंदाजात असेही म्हटले होते की, अभिषेकने आपल्या वडिलांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त हे सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे.

त्या काळात अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या साखरपुड्याची बातमी बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. दोन मोठी फिल्मी घराणी एकत्र येणार असल्याने चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र काही महिन्यांतच हे नाते तुटल्याची बातमी समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला.

नाते तुटण्यामागील कारणांबाबत अनेक चर्चा

बच्चन आणि कपूर कुटुंबीयांनी कधीही अधिकृतपणे या ब्रेकअपमागचे कारण सांगितले नाही. मात्र माध्यमांमध्ये विविध चर्चा रंगल्या होत्या. काही रिपोर्ट्सनुसार, करिश्माची आई बबिता कपूर यांची इच्छा होती की लग्नानंतरही करिश्माने चित्रपटसृष्टीत सक्रिय राहावे. तसेच तिच्या भविष्यासंदर्भात काही आर्थिक आणि व्यावसायिक अटी ठरवण्यात याव्यात अशी मागणी होती.

दुसरीकडे बच्चन कुटुंब या गोष्टींसाठी तयार नसल्याचे म्हटले गेले. परिणामी अभिषेक आणि करिश्माचे नाते पुढे जाऊ शकले नाही. मात्र या सर्व गोष्टींबाबत दोन्ही कुटुंबांनी कधीही सार्वजनिकरित्या भाष्य केलेले नाही. त्यामुळे खरी कारणे आजही गूढच मानली जातात.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?