AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोर

अफगाणिस्तानिविरूद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या संघात अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे दोघंही नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. असं असताना निवड समिती अध्यक्ष अजीत आगरकर यांनी कारण सांगितलं आहे.

India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोर
India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोरImage Credit source: PTI
| Updated on: May 19, 2026 | 7:40 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना बीसीसीआयने पुढची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात अष्टपैलू आणि फिरकीची धुरा असणारे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचं नाव नाही. या दोघांना संघाबाहेर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण मधल्या फळीत हे दोन्ही खेळाडू हुकूमाचे एक्के ठरतात. या दोघांनी आतापर्यंत अनेक सामने जिंकवले आहेत. वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार करता या दोघांना या संघात असायला हवं होतं. पण या दोघांना संघातून वगळण्याचं कारण मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितलं आहे. अजित आगरकर यांनी सांगितलं की, वनडे वर्ल्डकप अजून खूप लांब आहे. त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या पर्यायांची चाचपणी करत आहे.

अजित आगरकर म्हणाले की…

अजित आगरकर यांनी टीम इंडियाच्या निवडीनंतर पत्रकार परिषदेला समोरं गेला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘वनडे क्रिकेटचं बोलायचं तर अजून वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15-16 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. आम्ही अजून काही पर्यायांची चाचपणी करत आहोत. खासकरून दक्षिण अफ्रिकेतील स्थिती आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही नव्या खेळाडूंना संधी देऊ इच्छित आहोत. आम्हाला माहिती आहे की, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा काय करू शकतात. पण ही वेळ दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्याची आहे.’ दुसरीकडे, टीम इंडियात मोहम्मद शमीला संधी मिळेल असं वाटलं होतं. पण त्यालाही डावलण्यात आलं. अजीत आगरकरने त्याचंही कारण सांगितलं.

अजित आगरकरने मोहम्मद शमीला न निवडण्याचं कारण सांगताना स्पष्ट केलं की, ‘आम्हाला सांगितलं गेलं की मोहम्मद शमी टी20 क्रिकेटसाठी तयार आहे. यासाठी त्याच्या नावाची चर्चा झाली नाही.’ दरम्यान, वनडे संघातून यशस्वी जयस्वाललाही डावलण्यात आलं. जयस्वालने दक्षिण अफ्रिकेत वनडे मालिका खेळली होती. त्यात शतकी खेळी केली होती. पण त्यालाही संघात निवडलं नाही.

भारताचा वनडे संघ: शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बराड़ आणि हर्ष दुबे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...