AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये नापास! विराट-रोहितने विदेशात खेळलेल्या पहिल्या 3 सामन्यात काय केलं होतं? जाणून घ्या

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाचवा आणि शेवटचा औपचारिक टी20 सामना शिल्लक आहे . कारण ही मालिका इंग्लंडने 3-0 ने आधीच जिंकली आहे. असं असताना या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी फेल गेला आहे. आता त्याच्या खेळाच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये नापास! विराट-रोहितने विदेशात खेळलेल्या पहिल्या 3 सामन्यात काय केलं होतं? जाणून घ्या
वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्य़े नापास! विराट-रोहितने विदेशात खेळलेल्या पहिल्या 3 सामन्यात काय केलं होतं? जाणून घ्याImage Credit source: Getty Images/ PTI
| Updated on: Jul 10, 2026 | 8:48 PM
Share

आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका गमावल्यानंतर भारताची इंग्लंडमध्येही तीच स्थिती आहे. भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका चौथ्या सामन्यानंतर 3-0 ने गमावली. या मालिकेत भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे निष्फळ ठरली. ज्या खेळाडूंवर विश्वास टाकला त्यांनीच घात केला असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार अपेक्षा होता. अवघ्या 15व्या वर्षी त्याच्या डोक्यावर अपेक्षांचा भार पडला होता. त्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा देण्यासाठी दबावही होता. पण वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत सर्व फासे उलटे पडले. वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून तीन सामने खेळले आहेत. पण तिन्ही सामन्यात त्याची बॅट काही चालली नाही. वैभव सूर्यवंशीने मँचेस्टरमध्ये 14, नॉटिंघमध्ये 13 आणि ब्रिस्टलमध्ये 15 धावा केल्या. त्याची खेळी पाहून आता टीकाकारांनी त्याच्या फलंदाजीच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दुसरीकडे, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडू विदेशातील पहिल्या तीन सामन्यात कशी कामगिरी केली होती? असा प्रश्नही विचारला जात आहे.

विराट कोहलीने विदेशातील पहिल्या तीन सामन्यात काय केलं?

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2008 मध्ये पदार्पण केलं. श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिकेत खेळण्याची संधी त्याला मिळाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात फक्त 10 धावा करू शकला. दुसऱ्या वनडे सामन्यात 37 धावांची खेळी केली, पण त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 55चा होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने 25 धावा केल्या. यातही त्याचा स्ट्राईक रेट हा 65चा होता. पण विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 85 शतकं ठोकली आहेत. पण पहिल्या तीन डावात फेल गेला होता.

रोहित शर्माचे पहिले तीन सामने कसे होते?

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात वनडे मालिकेपासून झाली. रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात फक्त 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर डरबनमध्ये झालेल्या टी20 सामन्यात नाबाद 50 धावा केल्या. त्यानंतर पुन्हा 8 धावांवर बाद झाला. रोहित शर्माची सुरूवात फार काही ग्रेट झाली नाही. 2013 पर्यंत रोहित शर्मा टीम इंडियात जागा पक्की करण्यासाठी स्ट्रगल करत होता. पण ओपनिंगची संधी मिळाली आणि त्याच्या करिअरचा ग्राफ उंचावला.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची सुरूवात काही खास झाली नाही. पण आज त्यांचा नावलौकिक आहे. असंच काहीसं वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत होऊ शकतं. वैभव कार्यक्षम आहे. पण पहिल्या तीन सामन्यात फेल गेल्याने ट्रोल करण्याऐवजी त्याला जास्तीत जास्त संधी देण्याची गरज आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला