INDA vs SLA : वैभव सूर्यवंशी संतापला, श्रीलंकेच्या खेळाडूला जोरात धक्का आणि मग हात.., पाहा व्हीडिओ

Vishen Halambage vs Vaibhav Sooryavanshi : क्रिकेट चाहत्यांना श्रीलंका ए विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं तापट रुट पाहायला मिळालं. वैभवने लहान आहे म्हणून हलक्यात घ्यायचं नाही, जशास तसं उत्तर देऊ शकतो, हे दाखवून दिलंय.

INDA vs SLA : वैभव सूर्यवंशी संतापला, श्रीलंकेच्या खेळाडूला जोरात धक्का आणि मग हात.., पाहा व्हीडिओ
Vishen Halambage vs Vaibhav Sooryavanshi
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 15, 2026 | 8:31 PM

ट्राय नॅशन ए 2026 सीरिजमध्ये यजमान श्रीलंकाने टीम इंडियावर सुपर ओव्हरमध्ये (SLA vs INDA Super Over) विजय मिळवला. श्रीलंका टीमने सुपर ओव्हरमध्ये 16 धावा केल्या. मात्र टीम इंडियाकडून 17 रन्सचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे या दोघांना फक्त 9 धावाच करता आल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे विजय मिळवला. त्यानंतर श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी विजयाच्या उत्साहात वैभव सूर्यवंशी याला उद्देशून काही तरी म्हटलं. त्यानंतर वैभव खवळला. वैभवने पाठचा पुढचा विचार न करता थेट श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का दिला. वैभवने यासह आपण पण कमी नाही हे दाखवून दिलं. या सर्व वादाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

नक्की काय झालं?

सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे भारतीय कर्णधार तिलक वर्मा याने मोठ्या आग्रहाने पंचांकडे सुपर ओव्हरसाठी मागणी केली. त्यानंतर सुपर ओव्हर होणार हे निश्चित झालं. श्रीलंकेच्या फलंदाजांनी 16 धावा जोडल्या. मात्र 17 धावांचा पाठलाग करताना सूर्यांश आणि वैभव भारताला विजयी करण्यात अपयशी ठरले. श्रीलंका विजयी झाली. विजयी जल्लोष सुरु झाला. तर वैभव आणि सूर्यांश निराश होऊन मैदानाबाहेर निघाले. मात्र श्रीलंकेच्या विशेन हालामबेग याने वैभव आणि सूर्यांशला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वैभवने श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का दिला. मात्र विषय वाढण्याआधीच श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी मध्यस्थी केली आणि या प्रकरणाला पूर्णविराम लावला. त्यानंतर वैभवने ड्रेसिंग रुमच्या दिशेने जाताना श्रीलंकेच्या खेळाडूंकडे हात दाखवत राग व्यक्त केला.

वैभवकडून चाहत्यांची निराशा

वैभव सूर्यवंशी याला या मालिकेत आतापर्यंत त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. वैभव श्रीलंकेविरुद्धही अपयशी ठरला. वैभवने मुख्य सामन्यात 14 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. तर वैभवला सुपर ओव्हरमध्येही भारताला विजयी करता आलं नाही.

भरमैदानात तुफान राडा, वैभवचा पारा चढला

सामन्यात काय झालं?

दरम्यान श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारताला संपूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. श्रीलंकेने भारताला 4 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारतीय संघाचं 49.2 ओव्हरमध्ये 265 धावांवर पॅकअप झालं. श्रीलंकेलाही 50 ओव्हरमध्ये 265 रन्सच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने विजय मिळवला.

Follow Us