KL Rahul चं खणखणीत शतक, इंग्लंड विरूद्धच्या सीरिजमध्ये ओपनिंगसाठी दावा मजबूत

KL Rahul Century : केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व करत होता. दिल्लीचं आव्हान संपुष्ठात आल्यानंतर केएल इंग्लंडमध्ये आला आणि त्याने धमाकेदार शतक झळकावलं.

KL Rahul चं खणखणीत शतक, इंग्लंड विरूद्धच्या सीरिजमध्ये ओपनिंगसाठी दावा मजबूत
KL Rahul Century IND A vs ENG Lions
Image Credit source: Visionhaus/Getty Images
| Updated on: Jun 06, 2025 | 10:14 PM

इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडिया चाहत्यांसाठी इंग्लंडमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याने इंग्लंडमध्ये धमाकेदार शतक झळकावत कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वाल याच्यासह ओपनिंगसाठी दावा ठोकला आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यात यशस्वीसह ओपनिंग कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र केएलने एका खेळीतच टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी कमी केलीय.

इंग्लंड लायन्स विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यात काउंटी ग्राउंड, नॉर्थम्पटन येथे दुसरी अनऑफीशियल टेस्ट मॅच खेळवण्यात येत आहे. केएलने या सामन्यातील पहिल्याच दिवशी खणखणीत शतक झळकावलं. आयपीएलच्या 18 व्या मोसमात केएलने दमदार कामगिरी केली. केएलने त्याच जोराने इंग्लंडमध्ये येत शतक ठोकलं आणि अप्रतिम सुरुवात केली. केएलला सर्फराज खान याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. केएलने या संधीचं सोनं केलं आणि निवड समितीचा निर्णय योग्य ठरवून दाखवला.

केएलचं 18 वं शतक

केएल राहुलने 102 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर केएलने टॉप गिअर टाकला. केएलने पुढील 50 धावा या फक्त 49 चेंडूत पूर्ण केल्या. केएलने 151 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केलं. केएलच्या फर्स्ट क्लास क्रिकेट कारकीर्दीतील हे 18 वं शतक ठरलं. केएलला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र केएल शतकानंतर थोड्या धावा करुन आऊट झाला. केएलने 168 बॉलमध्ये 15 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 116 रन्स केल्या.

चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

इंग्लंड लायन्सने टॉस जिंकून इंडिया एला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. यशस्वी जयस्वाल 17 आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन 11 रन्स करुन आऊट झाले. त्यामुळे 2 आऊट 40 अशी स्थिती झाली. त्यानंतर केएल आणि करुण नायर या दोघांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी केएल आणि करुण जोडीने 86 धावांची भागीदारी केली. त्यानंतर करुण नायर 40 रन्सवर आऊट झाला.

करुणनंर ध्रुव जुरेल मैदानात आला. केएल आणि ध्रुव या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी 121 धावा जोडल्या. त्यानंतर ध्रुव आऊट झाला. ध्रुवने 87 बॉलमध्ये 7 फोरसह 52 रन्स केल्या. ध्रुव आऊट झाल्यानंतर केएलही आऊट झाला. त्यामुळे इंडिया ए टीमचा स्कोअर 5 आऊट 252 असा झाला. आता उर्वरित 5 फलंदाज किती धावांपर्यंत पोहचवतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

केएल राहुलकडून इंग्लंड दौऱ्याची शतकाने सुरुवात

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), करुण नायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटीयन, अंशुल कंबोज, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.