AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धा सुरू असताना टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती, अचानक निर्णय घेण्याचं कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने निवृत्ती घेतली. 35 वर्षीय आयपीएल स्पर्धेत 4 संघांसाठी 78 सामने खेळले. खेळाडूने निवृत्ती घेता एका व्यक्तीचे आभार मानले.

आयपीएल स्पर्धा सुरू असताना टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती, अचानक निर्णय घेण्याचं कारण की...
आयपीएल स्पर्धा सुरू असताना टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती, अचानक निर्णय घेण्याचं कारण की...Image Credit source: PTI
| Updated on: May 22, 2026 | 7:55 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. असं असताना अष्टपैलू विजय शंकर याने निवृत्ती जाहीर केली. राइड हँडेड फलंदाज असलेल्या विजय शंकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावर स्पष्ट केलं की आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार नाही. करिअरमध्ये पुढे काही करण्याच्या हिशेबाने त्याना हा निर्णय घेतला. विजय शंकर तामिळनाडू संघासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आहे. तर आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेविल्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी खेळला आहे. विजय शंकरने निवृत्ती घेताने एका व्यक्तीचे आभार मानले. एक चांगला क्रिकेटपटू होण्यास त्याच्यामुळे मदत झाल्याचं सांगितलं.

काय म्हणाला विजय शंकर?

विजय शंकर याने निवृत्तीची घोषणा करताना लिहिलं की, ‘क्रिकेट माझं जीवन आहे. मी 10 वर्षांचा असल्यापासून क्रिकेट खेळत आहे. 25 वर्षांचा असताना मी प्रत्येक स्तरावर क्रिकेट खेळलो. देशाच्या संघात खेळणं माझ्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाच्या क्षणापैकी एक आहे. मी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे. कारण मी क्रिकेटमध्ये नवीन संधी शोधू शकेन आणि अधिक खेळू शकेन. फक्त धन्यवाद बोलून चालणार नाही. ज्याच्यामुळे मी इतकं करू शकलो त्यांच्याप्रती मी प्रेम व्यक्त करतो. कायम त्यांचा ऋणी राहीन.’

विजय शंकरने निवृत्तीनंतर बीसीसीआय आणि क्रिकेट संघाचे आभार मानत लिहिलं की, ‘नागपूरमध्ये भारतासाठी 500व्या वनडेमध्ये शेवटचं षटक टाकलं आणि 2019 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. हे क्षण माझ्यासाठी खूप काही आहेत. ते क्षण मला कायम स्मरणात राहतील. मी आयपीएलमधील गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे आभार व्यक्त करतो. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अंडर 13, अंडर 15, अंडर 17, अंडर 19, अंडर 22, अंजर 25 आणि शेवटचं वरिष्ठ संघात मी माझं सर्वाधिक आयुष्य काढलं आहे. या प्रत्येक पावलावर बरोबर असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो. कोच, सपोर्ट स्टाफ, फीजियो, ट्रेनर्स, ग्राउंड्समॅन, मीडिया आणि मित्रांचे आभार व्यक्त करतो.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...