IND vs PAK : पाकिस्तानला आठव्यांदा पराभूत केल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, पाहा काय काय केलं ते

IND vs PAK, World Cup 2023 : भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सलग आठव्यांदा भारताने पराभव केला आहे. यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. चला पाहुयात नेटकऱ्यांनी काय काय मीम्स शेअर केले आहेत ते

IND vs PAK : पाकिस्तानला आठव्यांदा पराभूत केल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, पाहा काय काय केलं ते
IND vs PAK : पाकिस्तानने पराभवाची मालिका कायम ठेवल्याने सोशल मिडियावर एका पेक्षा एक सरस मीम्स,पाहा काय ते
| Updated on: Oct 14, 2023 | 10:51 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज अशा भारत पाकिस्तान सामन्याचा निकाल लागला आहे. भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आहे. वनडे वर्ल्डकप इतिहासातील पाकिस्तानचा सलग आठवा पराभव आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्येही पाकिस्तानला ही प्रथा मोडता आली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु असलेली तू तू मै मै आता संपली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे फॅन्स एकदम गायब झाले आहेत. भारतीय संघाचे चाहते एकापेक्षा एक सरस मीम्स शेअर करत आहेत. हे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. यात पाकिस्तानचा पराभव आणि आतापर्यंत काय झालं हे मिश्किलपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1992 ला पहिला सामना झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानचा संघ विजय मिळवण्यात अपयशी टरला आहे. भारतीय क्रिकेट फॅन्ससोबत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानची फिरकी घेतली. दुसरीकडे चाहत्यांचे मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

 

पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 30.3 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने हा सामना एकहाती जिंकला. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कर्णधार रोहित शर्मा याने 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 63 चेंडूत 86 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावांची खेळी केली. तसेच विजयी चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.तसेच पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने गुणतालिकेतही फायदा झाला. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारताने आणखी चार सामने जिंकले की उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.