AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus WTC Final : पाचव्या दिवशी Virat Kohli ऑस्ट्रेलियासाठी जास्त डेंजरस, हे घ्या आकडेच बघा

Ind vs Aus WTC Final : आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा शेवटचा दिवस आहे. इतिहास रचण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे. आज पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे.

Ind vs Aus WTC Final : पाचव्या दिवशी Virat Kohli ऑस्ट्रेलियासाठी जास्त डेंजरस, हे घ्या आकडेच बघा
ind vs aus wtc final 2023 virat kohliImage Credit source: AFP
| Updated on: Jun 11, 2023 | 11:37 AM
Share

लंडन : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. आज कसोटीचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी जी टीम सरस खेळणार, ते टेस्ट चॅम्पियन ठरणार. टीम इंडियाकडे आज इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. आज पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. टीम इंडियाने आज बाजी मारली, तर पुढची अनेक वर्ष या कामगिरीचे दाखले दिले जातील. इतरांच्या मनात विजयाची प्रेरणा निर्माण होईल. टीम इंडियाला विजयासाठी 280 धावांची गरज असून त्यांचे 7 विकेट शिल्लक आहेत.

ही टेस्ट मॅच असली, तर आज वनडेसारखं क्रिकेट खेळावं लागेल. भारतीय क्रिकेट चाहत्यांना आज विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेकडून भरपूर अपेक्षा आहेत. दोघे क्रीजवर नाबाद आहेत.

ऑस्ट्रेलियाची चिंता नक्कीच वाढेल

टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे पाचव्या दिवसाचे आकडे पाहिले, तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात. मागच्या 10 वर्षात विराट कोहलीने टेस्ट मॅचच्या पाचव्यादिवशी तीनवेळा 100 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. अन्य कुठल्याही फलंदाजाला पाचव्यादिवशी कोहलीसारखं खेळणं जमलेलं नाही.

कुठल्या देशांविरुद्ध कोहलीची पाचव्यादिवशी शतकं

विराट कोहलीने 2014 साली एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 141 धावा केल्या होत्या. वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध कोहलीने 2014 मध्ये 105 धावा केल्या होत्या. 2017 मध्ये कोहलीने कोलकात्यात श्रीलंकेविरुद्ध 104 धावा केल्या होत्या. आतापर्यंत पाचव्यादिवशी कोहलीने किती धावा केल्यात?

कोहलीने टेस्ट मॅचच्या पाचव्यादिवशी 14 इनिंगमध्ये एकूण 696 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 69.60 होती. कोहली WTC फायनल मॅचच्या चौथ्या दिवशी 44 धावांवर नाबाद आहे. पाचव्या दिवशी शतकी खेळी साकारुन कोहलीचा टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड