India vs Leicestershire Day 1: श्रीकर भरत एकटा लढतोय, वॉकर समोर भारताचे दिग्गज फलंदाज फेल

| Updated on: Jun 24, 2022 | 7:59 AM

इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) एजबॅस्टनमध्ये पहिला कसोटी सामना खेळण्याआधी टीम इंडिया लीसेस्टरशायर विरुद्ध (India vs Leicestershire) सराव सामना खेळत आहे.

India vs Leicestershire Day 1: श्रीकर भरत एकटा लढतोय, वॉकर समोर भारताचे दिग्गज फलंदाज फेल
srikar bharat
Follow us on

मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) एजबॅस्टनमध्ये पहिला कसोटी सामना खेळण्याआधी टीम इंडिया लीसेस्टरशायर विरुद्ध (India vs Leicestershire) सराव सामना खेळत आहे. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 246 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे संपूर्ण दिवसात फक्त 60.2 षटकांचा खेळ होऊ शकला. श्रीकर भरतने (Srikar Bharat) सर्वाधिक 70 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी भरत 70 आणि मोहम्मद शमी 18 धावांवर खेळतोय. विराट कोहली, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी सारखे दिग्गज फलंदाज अनुभवाने कमी असलेल्या इंग्लिश गोलंदाज रोमन वॉकर समोर ढेपाळले. वॉर्करने अजून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यु सुद्धा केलेला नाही. पण त्याने आपल्या गोलंदाजीने भारताच्या दिग्गज फलंदाजांना हैराण केलं.

भरत शिवाय बाकी फलंदाज फ्लॉप

कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीमचा ओपनर शुभमन गिल 9 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. विल डेविसच्या चेंडूवर त्याने विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेल दिला. त्यानंतर रोहित शर्मा 25 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरही स्वस्तात बाद झाले. अय्यर खातही उघडू शकला नाही, तेच हनुमा विहारीने फक्त 3 धावा केल्या. रवींद्र जाडेजाच्या रुपात भारताची पाचवी विकेट गेली. जाडेजा 13 चेंडूत 13 धावा करुन आऊट झाला. निम्मा भारतीय संघ 81 धावात तंबूत परतला होता.

भरतने एकट्याने संभाळला डाव

विराट कोहली आणि श्रीकर भरतने भारताचा डाव सावरला. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. विराट कोहली श्रीकर भरतची जास्त काळ साथ देऊ शकला नाही. दुसऱ्याबाजूला भरतने टिकून फलंदाजी केली. त्याने 111 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 1 षटकार आहे. उमेश यादवने 23 धावा करुन भरतला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला सुद्धा रोमन वॉकरने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. शमी 18 धावा करुन क्रीझवर आहे.

रोमन वॉकरने हैराण केलं

भारतीय फलंदाजांना लीसेस्टरशायरचा गोलंदाज रोमन वॉकर समोर संघर्ष करावा लागला. वॉकरने 11 षटकात 24 धावा देत पाच विकेट काढल्या. त्याने सर्वात आधी रोहित शर्माची विकेट काढली. शॉर्ट चेंडू टाकून पुलच्या जाळ्यात अडकवलं.