India vs New Zealand, LIVE Score, T20 Updates: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आज माऊंट माऊंगानुई येथे दुसरा टी 20 सामना झाला. टी 20 वर्ल्ड कपमधील पराभवाच्या कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया आज मैदानात उतरली होती. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या बळावर 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 191 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 126 धावात आटोपला.
भारत: हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
न्यूजीलंड: केन विलियमसन (कॅप्टन), डेवॉन कॉनवे, फिन एलेन, ग्लेन फिलिप्स, डेवन सिनवे, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, मायकल ब्रेसवेल, ईश सोढ़ी, मिशेल सँटनर, लॉकी फर्ग्यूसन, टिम साऊदी, ब्लेयर टिकनर
टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना जिंकून विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय मिळवला. भारताच्या 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 126 धावात आटोपला.
18 ओव्हरअखेरीस न्यूझीलंडच्या 7 बाद 125 धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडकडून कॅप्टन केन विलयम्सनने अर्धशतक झळकावलं. मोहम्मद सिराजने त्याला 61 धावांवर बोल्ड केलं.
न्यूझीलंडच्या सहा विकेट गेल्या आहेत. मोहम्मद सिराजने सँटरनला आपल्याच गोलंदाजीवर 2 रन्सवर आऊट केलं. 16 षटकांअखेरीस न्यूझीलंडच्या 6 बाद 99 धावा झाल्या आहेत.
12 षटकांअखेरीस न्यूझीलंडच्या 3 बाद 85 धावा झाल्या आहेत.
11 षटकांअखेरीस न्यूझीलंडच्या 3 बाद 77 धावा झाल्या आहेत. कॅप्टन केन विलयम्सन 30 आणि डॅरेल मिचेलची 5 जोडी मैदानात आहे.
युजवेंद्र चहलने न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. त्याने ग्लेन फिलिप्सला बोल्ड केलं. 6 चेंडूत 12 धावा करताना त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. 10 षटकाअखेरीस न्यूझीलंडच्या 3 बाद 71 धावा झाल्या आहेत.
वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. डेवॉन कॉनवेला त्याने अर्शदीपकरवी झेलबाद केलं. कॉनवेने 22 चेंडूत 25 धावा करताना तीन चौकार लगावले. 9 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या 2 बाद 63 धावा झाल्या आहेत.
7 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या एक बाद 49 धावा झाल्या आहेत. कॉनवे 20 आणि विलयम्सन 24 धावांवर खेळतोय.
पहिल्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला धक्का दिला आहे. फिन एलनला शुन्यावर अर्शदीपकरवी झेलबाद केलं. चार ओव्हर अखेरीस न्यूझीलंडच्या एक बाद 16 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे आणि केन विलयम्सनची जोडी मैदानात आहे.
न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदीने हॅट्रिक घेतली. त्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्या 13, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदरला भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवलं. सूर्यकुमार यादवला बॅटिंगची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचली नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 192 धावांच लक्ष्य दिलं आहे.
20 ओव्हर्समध्ये भारताने 6 विकेट गमावून 191 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारच्या शतकामुळे हे शक्य झालं. त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 7 षटकार आहेत.
सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात शतक झळकावलं. त्याने 49 चेंडूत शतक झळकावलं. हे टी 20 मधलं त्याच दुसरं शतक आहे. याआधी इंग्लंड विरुद्ध त्याने शतक झळकावलं होतं. 19 ओव्हर्समध्ये भारताच्या 3 बाद 186 धावा झाल्या आहेत.
18 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताच्या 3 बाद 164 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव 45 चेंडूत 89 धावांवर खेळतोय.
17 ओव्हरनंतर टीम इंडियाच्या 3 बाद 146 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार 72 आणि हार्दिक 8 धावांवर खेळतोय.
सूर्यकुमार यादवच्या खेळात सातत्य कायम आहे. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये त्याने हाफ सेंच्युरी झळकावली. 32 चेंडूत अर्धशतक झळकवताना त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. 16 ओव्हर्समध्ये भारताच्या 3 बाद 129 धावा झाल्या आहेत.
15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताच्या 3 बाद 119 धावा झाल्या आहेत.
चांगली फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर हिट विकेट झाला. त्याने 9 चेंडूत 13 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार आहे. 13 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 3 बाद 110 धावा झाल्या आहेत. आता सूर्यकुमारला साथ देण्यासाठी कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आलाय.
ईश सोढीने 12 वी ओव्हर टाकली. भारताच्या दोन बाद 97 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरने सोढीच्या ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या.
दमदार फलंदाजी करणारा इशान किशन OUT झाला. सोढीच्या गोलंदाजीवर त्याने साऊदीकडे झेल दिला. इशानने 31 चेंडूत 36 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार आहे. 10 ओव्हर्समध्ये भारताच्या 2 बाद 75 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरची जोडी मैदानात आहे.
9 ओव्हर्समध्ये भारताच्या एक बाद 69 धावा झाल्या आहेत. मिचेल सँटनरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार मारला.
8 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. भारताच्या 1 बाद 59 धावा झाल्या आहेत. इशान किशन आणि सूर्यकुमार यादवची जोडी मैदानात आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला आहे. 6.4 षटकात एक बाद 50 धावा झाल्या आहेत. इशान किशन 22 चेंडूत 28 आणि सूर्यकुमार यादव 5 चेंडूत 6 धावांवर खेळतोय. इशानने 4 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. सूर्यकुमारने 1 चौकार मारलाय.
सहा ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. पावरप्लेमध्ये भारताच्या एक बाद 42 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत आज स्वस्तात बाद झाला. 13 चेंडूत त्याने 6 धावा केल्या. यात एक चौकार होता. फर्ग्युसनने त्याला साऊदीकरवी झेलबाद केलं. इशान किशन 18 चेंडूत 20 आणि सूर्यकुमार 5 चेंडूत 6 धावांवर खेळतोय. इशानने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा टी 20 सामना सुरु आहे. 5 ओव्हर्सचा खेळ झालाय. भारताच्या बिनबाद 36 धावा झाल्या आहेत.
भारत वि न्यूझीलंड सामना सुरु झाला आहे. 3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी मैदानात आहे. भारताच्या तिसऱ्या षटकाअखेरीस बिनबाद 21 धावा झाल्या आहेत. टीम साऊदीने तिसरी ओव्हर टाकली.
भारत वि न्यूझीलंड सामना सुरु झाला आहे. 2 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी मैदानात आहे. भारताच्या दुसऱ्या षटकाअखेरीस बिनबाद 14 धावा झाल्या आहेत. एडम मिल्नेने दुसरी ओव्हर टाकली.
भारत वि न्यूझीलंड सामना सुरु झाला आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी मैदानात आहे. भारताच्या पहिल्या षटका अखेरीस बिनबाद 6 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंतने एक चौकार लगावला. टीम साऊदीने पहिली ओव्हर टाकली.
राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक
राज्यपालांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन
पुण्यातील लाल महालासमोर युवक काँग्रेसच आंदोलन
प्रतिकात्मक धोतर जाळून कोश्यारी यांच्या फोटोला मारले जोडे
नाशिकच्या सातपूर परिसरात केलं शिवप्रेमींनी आंदोलन
कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन
भारत: इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल,
2ND T20I. India XI: I Kishan, R Pant (wk), S Yadav, S Iyer, D Hooda, H Pandya (c), W Sundar, Y Chahal, A Singh, B Kumar, M Siraj. https://t.co/mIKkpCMN8R #NZvIND
— BCCI (@BCCI) November 20, 2022
आज माऊंट माऊंगानुई येथे दुसरा टी 20 सामना होणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.
New Zealand have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I against #TeamIndia.
Follow all the LIVE updates here – https://t.co/OvmynDiyd8 #NZvIND pic.twitter.com/fkE2y9nbLl
— BCCI (@BCCI) November 20, 2022
माऊंट माऊंगानुईमध्ये पाऊस सुरु होता. पण आता हवामान स्वच्छ आहे. पीचवरुन कव्हर्स हटवण्यात आले आहेत. म्हणजेच मॅच वेळेवर सुरु होईल.