AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ WTC Final | टीम इंडिया जिंकल्यास कपडे उतरवेन, असं पुन्हा म्हणू का? पूनम पांडेचा बोल्ड प्रश्न

2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास नग्न होण्याची घोषणा करत पूनमने लक्ष वेधून घेतलं होतं. तिची ही आवड लक्षात घेत पत्रकार परिषद काही जणांनी पूनमला या मुद्द्यावरुन छेडलं

IND vs NZ WTC Final | टीम इंडिया जिंकल्यास कपडे उतरवेन, असं पुन्हा म्हणू का? पूनम पांडेचा बोल्ड प्रश्न
Poonam Pandey
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 9:49 AM
Share

मुंबई : बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिला चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची क्लुप्ती ठाऊक आहे. चित्रपट आणि टीव्ही विश्वातील स्पॉटबॉईजना धान्याची किट देण्यासाठी पूनम पांडे दोन दिवसांपूर्वी मुंबईत आली. यावेळी भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्याविषयी पूनमला पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावर ‘भारत जिंकला तर मी पुन्हा कपडे उतरवू का?’ असा प्रतिप्रश्न विचारत पूनमने सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. (India VS New Zealand WTC Final Actress Poonam Pandey Shocking Question asks Should I Say I Will Strip Again)

काय म्हणाली पूनम पांडे?

भारताच्या विजयानंतर स्ट्रिपिंग, अर्थात कपडे काढण्याचं धाडस पूनम पांडे याआधीही करायला निघाली होती. 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास नग्न होण्याची घोषणा करत पूनमने लक्ष वेधून घेतलं होतं. तिची ही आवड लक्षात घेत पत्रकार परिषद काही जणांनी पूनमला या मुद्द्यावरुन छेडलं. “क्रिकेट चालू आहे? लोक क्रिकेट खेळत आहेत? आणि हे होत असेल, तर टीम इंडिया यावेळी जिंकल्यास मी स्ट्रीप करेन, असं मी पुन्हा म्हणू का? मला याविषयी काही कल्पना नाही. मी घरी जाते. मी या कॉन्ट्रोव्हर्सीची शक्यता पडताळून पाहते” असं बिनधास्त उत्तर पूनमने दिलं.

नवरा म्हणतो “मी स्ट्रीप करु का?”

पूनमच्या धाडसी उत्तरानंतर तिचा पती सॅम बॉम्बेने माईकचा ताबा घेतला. “मी स्ट्रीप करु का?” असा प्रश्न त्याने विचारला, त्यावर पूनमने त्याला “तुला कपडे उतरवायचे आहेत का? नको करुस, नाहीतर भारत हरेल” असं म्हणत कोपरखळी मारली.

पूनमची गुपचूप लग्नगाठ

बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत 11 सप्टेंबरला पूनमने लगीनगाठ बांधली होती. फारसा गाजावाजा न करता पूनम गुपचूप लग्नाच्या बोहल्यावर चढली. पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. पूनम पांडे हिच्यावर लग्नानंतर अवघ्या दहा दिवसातच पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली होती. पतीने विनयभंग करुन धमकावल्याची तक्रार पूनमने गोव्यात दिली होती. पोलिसांनी दिग्दर्शक सॅम बॉम्बे याला अटक केली, मात्र त्याची जामिनावर सुटकाही झाली. त्यानंतर दोघांनी आपल्यातील वाद मिटवत पुन्हा घरोबा केला आहे.

संबंधित बातम्या

Poonam Pandey | मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे ‘या’ दिग्दर्शकासोबत लग्नाच्या बेडीत

मॉडेल पूनम पांडेला अटक, BMW कारही जप्त

पूनम पांडेसोबत आधी लग्नाची बेडी, आता पतीला पोलिसांच्या बेड्या

(India VS New Zealand WTC Final Actress Poonam Pandey Shocking Question asks Should I Say I Will Strip Again)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.