पूनम पांडेसोबत आधी लग्नाची बेडी, आता पतीला पोलिसांच्या बेड्या

पतीने आपला विनयभंग केल्याचा आरोप करत पूनम पांडेने सोमवारी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अटक होऊन त्याची जामिनावर सुटका झाली

पूनम पांडेसोबत आधी लग्नाची बेडी, आता पतीला पोलिसांच्या बेड्या
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 4:48 PM

पणजी : बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे हिच्यावर लग्नानंतर अवघ्या दहा दिवसातच पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली आहे. पतीने विनयभंग करुन धमकावल्याची तक्रार पूनमने गोव्यात दिली होती. पोलिसांनी दिग्दर्शक सॅम बॉम्बे याला अटक केली, मात्र त्याची जामिनावर सुटकाही झाली आहे. (Poonam Pandey files complaint against Husband Sam Bombay in Goa Sam Granted Conditional Bail by Goa Court)

पतीने आपला विनयभंग केल्याचा आरोप करत पूनम पांडेने सोमवारी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली होती. गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी पतीने दिल्याचा दावाही तिने केला होता. वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंगळवारी संध्याकाळी गोवा कोर्टाने सॅम बॉम्बे याची सुटका केली.

दक्षिण गोव्यातील कानाकोना गावात पूनम पांडे शूटिंग करत असलेल्या चित्रपटाच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. त्यानंतर पूनमची वैद्यकीय तपासणी होणार आहे. पतीला चार दिवस पोलिसात हजेरी लावावी लागणार असून या काळात त्याला तक्रारदार पत्नी पूनम पांडेशी संपर्क साधता येणार नाही.

पूनमची गुपचूप लग्नगाठ

बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत 11 सप्टेंबरला पूनमने लगीनगाठ बांधली होती. फारसा गाजावाजा न करता पूनम गुपचूप लग्नाच्या बोहल्यावर चढली. पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

46 वर्षीय सॅम अहमद बॉम्बे हा चित्रपट दिग्दर्शक आहे. तर पूनम पांडेने काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. बर्‍याचदा हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

पूनमने लग्नात एम्ब्रॉयडरी असलेला नेव्ही ब्लू लेहेंगा घातला होता. कपाळावर मोठा मांगटिका आणि हातात कलिरेही दिसत आहे. सॅमने तिला साजेशी रंगसंगती असलेला शेरवानी परिधान केला होता.

(Poonam Pandey files complaint against Husband Sam Bombay in Goa)
View this post on Instagram

Here’s looking forward to seven lifetimes with you.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

जुलैमध्ये दोघांनी आपली एंगेजमेंट झाल्याचे जाहीर केले होते. सॅमने अंगठ्या दाखवताना त्यांचे फोटो शेअर केले होते.

दरम्यान, मे महिन्यात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पूनम आणि सॅम बीएमडब्ल्यूमध्ये फिरत होते, ती गाडी जप्त करण्यात आली होती, तर दोघांना ताब्यात घेतल्यानंतर समज देऊन सोडण्यात आले होते.

संबंधित बातम्या

Poonam Pandey | मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे ‘या’ दिग्दर्शकासोबत लग्नाच्या बेडीत

मॉडेल पूनम पांडेला अटक, BMW कारही जप्त

(Poonam Pandey files complaint against Husband Sam Bombay in Goa)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.