IND vs PAK T20 World Cup: रोहित शर्माने टॉस जिंकला, अशी आहे टीम इंडियाची Playing 11

IND vs PAK T20 World Cup: टीम इंडियाने आज या पराभवाची सव्याज परतफेड करावी, अशीच जगभरातील तमाम क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे.

IND vs PAK T20 World Cup: रोहित शर्माने टॉस जिंकला, अशी आहे टीम इंडियाची Playing 11
ind vs pak
| Updated on: Oct 23, 2022 | 1:12 PM

मेलबर्न: ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात (Melbourne Ground) आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) महामुकाबला रंगणार आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची चर्चा आहे. अखेर आज तो क्षण जवळ आला आहे. मागच्यावर्षी यूएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा झाली होती. त्यावेळी सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर एकतर्फी विजय मिळवला होता. पाकिस्तानने भारतावर 10 विकेट राखून विजय मिळवला होता.

रोहित शर्माने जिंकला टॉस

या महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. भारताने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजही हा पराभव सलतोय

भारतीय क्रिकेट चाहत्यांना आजही हा पराभव सलतोय. वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं. याआधी कुठल्याही वनडे किंवा टी 20 मध्ये पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आला नव्हता.

टी 20 वर्ल्ड कपसाठी कसून तयारी

टीम इंडियाने आज या पराभवाची सव्याज परतफेड करावी, अशीच जगभरातील तमाम क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत. टीम इंडियाने या टी 20 वर्ल्ड कपसाठी कसून तयारी केली आहे.

टीम इंडियाकडून महत्त्वाचा फॅक्टर कोण?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा महत्त्वाचा फॅक्टर आहे. पहिल्या दोन सराव सांमन्यात सूर्यकुमार यादवने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली आहे.

टीम इंडियासाठी चिंतेचा विषय काय?

गोलंदाजी टीम इंडियासाठी थोडा चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराह या प्रमुख गोलंदाजाशिवाय टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार आहे. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्यास टीम इंडियाच्या विजयाची शक्यता जास्त आहे. टी 20 वर्ल्ड कपआधी आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानच्या टीम्स आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी दोन्ही टीम्सनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला होता.

टीम इंडियाची प्लेइंग इलेवन
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह

पाकिस्तानची प्लेइंग इलेवन
बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान, मोहम्मद रिजवान, शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ