IND vs SA Predicted Playing XI: दुसऱ्या T20 साठी कशी असेल प्लेइंग-11? कोण इन, कोण आऊट?

IND vs SA Predicted Playing XI: रोहित शर्मा 7 महिन्यानंतर परतलेल्या त्या गोलंदाजावर विश्वास दाखवून त्याला संधी देईल?

IND vs SA Predicted Playing XI: दुसऱ्या T20 साठी कशी असेल प्लेइंग-11? कोण इन, कोण आऊट?
team india win
| Updated on: Oct 02, 2022 | 11:18 AM

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत आज गुवाहाटीमध्ये दुसरा टी 20 सामना खेळला जाणार आहे. सीरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट राखून विजय मिळवला होता. दोन्ही टीम्समध्ये तीन टी 20 सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. टीम इंडिया सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. आज टीम इंडिया दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.

दुसऱ्या मॅचआधी टीम इंडियाला जसप्रीत बुमराहच्या रुपाने झटका बसला आहे. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तो मालिकेतून बाहेर गेला आहे. दुखापतीमुळे तो पहिल्या मॅचमध्येही खेळू शकला नव्हता.

सिराजला संधी मिळणार?

जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. आता त्याला सामन्यात संधी मिळते का? ते आज समजेल. जवळपास 7 महिन्यानंतर सिराज टीम इंडियाच्या टी 20 संघात परतला आहे. रोहितने त्याला संधी दिली, तर बदल होणं निश्चित आहे. मात्र ही शक्यता कमी दिसतेय.

वेगवान गोलंदाजांनी वाट लावली

टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी मागच्या सामन्यात कमाल केली होती. हर्षल पटेलने 6.5 च्या इकॉनमीने 2 विकेट घेतल्या होत्या. पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहरने कॅप्टन टेंबा बावुमा आणि ट्रिस्टन स्टबची विकेट काढली होती.

त्याची इकॉनमी सुद्धा 6 च्या जवळ होती. अर्शदीप सिंह प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याने 3 विकेट काढल्या. त्याची इकॉनमी 8 ची होती.

बेंचवर कोण बसणार?

या महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. अर्शदीप आणि हर्षल पटेल दोघेही वर्ल्ड कप टीमचा भाग आहेत. दीपक चाहर स्टँडबायवर आहे. रोहित आणि टीम मॅनेजमेंटचा या दोघांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न असेल.

वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची ही शेवटची टी 20 मालिका आहे. टीम इंडियात काही बदल होण्याची शक्यता कमी आहे. सिराजला बेंचवरच बसावं लागेल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेवन: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर आणि अर्शदीप सिंह