India vs South Africa, 3rd Test, DAY 2: केपटाऊनमध्ये अटी-तटीचा सामना, बुमराहने दक्षिण आफ्रिकेची लावली वाट

| Updated on: Jan 12, 2022 | 9:55 PM

भारताची सर्व मदार आता त्यांच्या गोलंदाजांवर आहे. मागच्या सात दक्षिण आफ्रिका दौऱ्यांमध्ये भारतीय संघाला एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

India vs South Africa, 3rd Test, DAY 2: केपटाऊनमध्ये अटी-तटीचा सामना, बुमराहने दक्षिण आफ्रिकेची लावली वाट
Team India चे सुधारीत वेळापत्रक जाहीर
Follow us on

केपटाऊन: कसोटीच्या दुसऱ्यादिवसाचा (cape town test) खेळ गोलंदाजांनी गाजवला. काल दक्षिण आफ्रिकेने भारताला 223 धावांवर रोखल्यानंतर (India vs South Africa) आज भारतीय गोलंदाजांनीच त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव 210 धावांवर आटोपला. पहिल्या डावात भारताने 13 धावांची निसटती आघाडी मिळवली. दुसऱ्याडावात भारताची सुरुवात निराशाजनकच झाली. केएल राहुल (10) (Kl Rahul) आणि मयंक अग्रवाल (7) हे दोन्ही सलामीवीर स्वतात बाद झाले.

दिवसअखेर भारताच्या दोन बाद 57 धावा झाल्या आहेत. पहिल्या डावातील 13 धावांच्या आघाडीमुळे भारताकडे एकूण 70 धावांची आघाडी आहे. सध्या विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची जोडी मैदानात आहे. विराट (14) आणि पुजारा (9) धावांवर खेळतोय. भारताकडून आज जबरदस्त खेळ केला तो जसप्रीत बुमराहने. चार वर्षांपूर्वी याच मैदानावर कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराहने आज पाच विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. त्याला मोहम्मद शमी आणि उमेश यादवकडून चांगली साथ मिळाली.

दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली. गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं आहे. कुठलीही जोडी खेळपट्टीवर जमणार नाही, याची शमी आणि उमेश यादवने काळजी घेतली. जोडी जमतेय असं वाटलं, तेव्हा दोघांनी विकेट काढल्या व दक्षिण आफ्रिकेला वरचढ होऊ दिले नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून फक्त एकट्या किगन पीटरसनने 72 धावांची एकाकी झुंज दिली. बुमराहनेच त्याचा अडसर दूर केला. कसोटीचं पारडं कुठल्या एका टीमच्या बाजूला झुकलं आहे, असं आता अजिबात म्हणता येणार नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे. उद्या फलंदाजी किंवा गोलंदाजीत जो संघ सरस ठरेल, तो मालिका विजयाचा प्रबळ दावेदार असेल.

 

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, जयंत यादव, प्रियांक पांचाल, उमेश यादव, हनुमा विहारी आणि इशांत शर्मा.

दक्षिण अफ्रीका: डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा, कगिसो रबाडा, सरेल इरवी, ब्युरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी निगीडी, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, कीगन पीटरसन, रासी वान डर डुसे , काइल वेरेने, मार्को यानसन, ग्लेनटन स्टुरमैन, प्रेनेलन सुब्रायेन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुआने ओलिवियर.