IND vs SA, Virat Kohli: शुन्यावर आऊट झाल्यानंतरही विराट कोहलीचा ड्रेसिंग रुममध्ये डान्स पाहा VIDEO

माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) 71 व्या शतकाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतायत. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) विराट कोहली मोठी खेळी खेळेल, अशी अपेक्षा होती.

IND vs SA, Virat Kohli: शुन्यावर आऊट झाल्यानंतरही विराट कोहलीचा ड्रेसिंग रुममध्ये डान्स पाहा VIDEO
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 8:08 PM

IND vs SA, Virat Kohli: माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) 71 व्या शतकाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतायत. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) विराट कोहली मोठी खेळी खेळेल, अशी अपेक्षा होती. पण किंग कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. फिरकी गोलंदाज केशव महाराजने त्याला टेंबा बावुमाकरवी झेलबाद केले.

त्याने टेन्शन घेतलं नाही.

विराट शुन्यावर बाद झाला असला, तरी त्याने त्याचं टेन्शन घेतलं नाही. ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहली खूप शांत होता, तो त्याची मजा करत होता. विराटने ड्रेसिंग रुममध्ये डान्सही केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिखर धवन त्यावेळी विराटच्या शेजारी बसला होता. तो ही विराटच्या या डान्स मूव्हजचा आनंद घेत होता.

मैदानावर आक्रमक दिसणार कोहली मैदानाबाहेर नेहमीच एन्जॉय करताना दिसतो. विराटने मागच्या आठवड्यात कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-1 ने गमावल्यानंतर विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मागच्यावर्षी त्याने टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बीसीसीआयने त्याला वनडे कॅप्टनशिपवरुन हटवलं.

विराट आता त्याची फ्रेंचायजी RCB साठी सुद्धा फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. विराट कोहली दोन वर्षानंतर शुन्यावर आऊट झाला. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये तो वेस्ट इंडिजविरुद्ध शुन्यावर आऊट झाला होता. वनडेमध्ये कोहली शुन्यावर आऊट होण्याची 14 वी वेळ आहे.