
मुंबई : वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंका (IND vs SL World Cup 2023) भिडणार असून हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारत सेमी फायनलध्ये आपली जागा पक्की करणार आहे. श्रीलंका आजच्या सामन्यात पराभूत झाली तर ते वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार आहेत. हा सामना दुपारी दोन वाजता सुरु होईल. याच मैदानावर 12 वर्षांपूर्वी करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालेलं. महेंद्र सिंह धोनी याने मारलेला सिक्सर आणि त्यानंतर रवी शास्त्री यांनी केलेली कॉमेंट्री भारतांच्या मनावर कोरलेली आहे. त्याच मैदानावर आज भारत-श्रीलंका आमने-सामने आहेत.
2011 आणि 2023 मधील श्रीलंकेच्या संघात जमीन-आस्मानचा फरक आहे. भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंका संघ कमकुवत आहे. भारताने यंदाच्या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावला नाही. त्यामुळे भारताला पराभूत करणं श्रीलंकेसमोर मोठं आव्हान असणार आहे. चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 धावांवर भारताच्या 3 विकेट गेल्या होत्या. मात्र विराट कोहली आणि के एल राहुल यांनी डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरूद्ध फलंदाजी ढेपाळली मात्र गोलंदाजांनी कोणतीही कसर सोडता भारताला विजय मिळवून दिला.
रोहित शर्माने हार्दिक पंड्या दुखापती झाल्यावर मोहम्मद शमी आणु सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. दोघांनीही आतापर्यंत संघाला जशी गरज असेल तशी कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यातही भारतीय संघ कोणतेही बदल न करता उतरेल अशीच शक्यता आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव .
श्रीलंकेचा संघ : कुशल मेंडिस (कर्णधार), कुशल परेरा, पथुम निसांका, दुष्मन चमीरा, दिमुथ करुणारत्ने, सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, महेश तिक्शिना, दुनिथ वेलालगे, कसून रजिथा, अँजेलो दुशान, एंजेलो माथे, ड्युशन माथे, ड्युनिथ वेलालगे. चमिका