IND vs ENG: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज फलंदाज दुखापतीतून सावरला, सरावासाठी मैदानात दाखल

| Updated on: Jul 27, 2021 | 2:08 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत.

IND vs ENG: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, हा दिग्गज फलंदाज दुखापतीतून सावरला, सरावासाठी मैदानात दाखल
अजिंक्य रहाणे
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC WTC 23) आगामी पर्वातील हा पहिलाच सामना असल्याने भारतासाठी चांगली कामगिरी करण अत्यंत महत्त्वाच आहे. पण भारतीय संघातील दुखापतींचे सत्र सुरुच असल्याने संघ व्यवस्थापन चिंतेत पडले आहे. पण याचवेळी भारतीय कसोटी संघातील हुकुमी एक्का आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मात्र फिट होऊन सरावासाठी मैदानात उतरला आहे.

अजिंक्य रहाणेच्या डाव्या पायाला (हॅमस्ट्रिंग) दुखापत झाली होती.  पायाला सूज आल्यामुळे तो काउंटी इलेवन संघाविरुद्धच्या सराव सामन्यातही भारतीय संघात नव्हता. त्याच्या पायाची सूज कमी करण्यासाठी मेडिकल टीम मेहनत घेत होती त्याला एक इंजेक्शनही लावण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्याचा पाय ठिक असून तो सरावासाठी मैदानात उतरला आहे.

अथवा केएल राहुलला संधी

रहाणे सध्या सराव करत असला तरी त्याच्या पायाची दुखापत पूर्णपणे ठिक झालेली नाही. त्यामुळे 4 ऑगस्टला होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये तो खेळू शकला नाही तर भारताला पर्यायी फलंदाजाला खेळवावे लागेल. दरम्यान काउंटी इलेवन विरुद्धच्या सराव सामन्यात अप्रतिम शतक झळकावलेल्या केएल राहुलला (KL Rahul) याठिकाणी संधी मिळू शकले. त्याला मधल्या फळीत एक विश्वासून फलंदाज म्हणून खेळवले जाऊ शकते. तसेच गोलंदाजीमध्येही मोहम्म्द सिराजला पहिल्या टेस्टमध्ये खेळवले जाऊ शकते. सोबतच पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांनाही श्रीलंका दौऱ्यानंतर थेट इंग्लंडला बोलावून घेतले आहे.

24 खेळाडूंपैकी 3 जण दुखापतीमुळे मालिकेबाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेपूर्वीच भारताचे तीन युवा खेळाडू दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. यामध्ये काउंटी xi संघाकडून सराव सामना खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरसह आवेश खानचा समावेश आहे. तर तिसरा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) भारताचा सलामीवीर शुभमन गिल आहे. WTC Final दरम्यान शुभमनला दुखापत झाली होती. त्यामुळे सामन्यानंतर शुभमनने दौऱ्यातून माघार घेत तो मायदेशी परतला आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतग्रस्त), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान (दुखापतग्रस्त) आणि अर्जान नाग्वासवाला.

हे ही वाचा

IND vs ENG : भारताचे दोन कसोटी फलंदाज संघात परत, ‘हे’ दोन खेळाडू होणार संघातून बाहेर

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

(Indian Batsman Ajinkya Rahane Back in team after injury may play against england at india vs England first test)