मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?

| Updated on: Jul 15, 2021 | 2:34 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघात कोरोनाने एन्ट्री केली असून एका महत्त्वाच्या खेळाडूलाच कोरोनाची लागण झाली आहे.

मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?
Follow us on

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (WTC) इंग्लंड विरुद्धचे कसोटी (England Test Series) सामने सुरु होण्यास बराच वेळ असल्याने भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत होते. याचवेळी संघातील एका महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. इंग्लंडच्या संघात मागील आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघाची कोरोना टेस्ट करण्यात आली यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतर खेळाडूंप्रमाणे ऋषभही मागील काही दिवस इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होता.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ऋषभ लंडनमध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात आहे. त्यामुळे गुरुवारी डरहमला जाणाऱ्या भारतीय संघासोबत तो जाणार नाही. सुदैवाने संघातील इतर खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली नसल्याचंही समोर येत आहे. भारतीय संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

पंतला डेल्टा वेरियंटची बाधा

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत मागील 8 दिवसांपासून विलगीकरणात असून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. मात्र तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून तो आणखी काळ विश्रांती करणार असून भारतीय संघ डरहमला खेळायला जाणाऱ्या सराव सामन्यासाठीही पंत संघासोबत नसणार आहे. पंतची प्रकृती ठिक होण्यासाठी किती दिवस लागतील, याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. दरम्यान मागील काही दिवसांपासून युकेमध्ये आढळणारा डेल्टा वेरियंटच पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.

यूरो 2020 चा सामना पडला महाग

बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यामनी युकेमधील कोरोना परिस्थितीमुळे खेळाडूंना इमेलद्वारे काही सूचना दिल्या होत्या. ज्यात त्यांनी खेळाडू आणि टीमच्या इतर सदस्यांना युरो चषक 2020 विम्बल्डनसारख्या भव्य स्पर्धांना हजेरी न लावण्याबाबत सतर्क केले होते. मात्र इतर खेळाडूंप्रमाणेच पंतने देखील इंग्लंड विरुद्ध जर्मनी या सामन्याला लंडनच्या वेम्बली मैदानात हजेरी लावली होती. त्यामुळे त्याचठिकाणी त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यष्टीरक्षक कोण?

ऋषभ पंतला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्याजागी संघात कोणाला स्थान मिळणार याबाबत संघ व्यवस्थापन अभ्यास करत आहे. दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंमध्ये वृद्धीमन साहा आणि लोकेश राहुल हे दोघेही यष्टीरक्षक फलंदाज असल्याने पंतच्या जागी या दोघांतील एकाला संघात स्थान मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

भारतीय खेळाडूंचा अतिशाहणपणा, गरज नसताना मिरवले, आता कोरोनाने जिरवली!

भारतीय संघात कोरोनाची एन्ट्री, 2 खेळाडू पॉझिटिव्ह, इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी चिंता वाढल्या!

(Indian Wicketkeeper Rishabh Pant Tested Corona Positive Before India vs England Test Match Series)