महिला क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी, BCCI ची मोठी घोषणा

भेदभाव संपवणारा महत्त्वाचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक मॅचसाठी किती लाख रुपये मिळणार ते जाणून घ्या....

महिला क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी, BCCI ची मोठी घोषणा
bcci
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 27, 2022 | 1:44 PM

मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCI ने ऐतिहासिक घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंना आता पुरुष क्रिकेटपटू इतकीच मॅच फी मिळणार आहे. म्हणजे महिला क्रिकेटपटूंना आता पुरुष क्रिकेटपटूं इतकेच पैसे मिळणार आहेत. दोघांची मॅच फी ची रक्कम समान असणार आहे.

टि्वटमध्ये काय म्हटलं?

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टि्वट करुन ही ऐतिहासिक घोषणा केली. “आता महिला क्रिकेटपटूंनाही पुरुष क्रिकेटपटूंइतकीच मॅच फी मिळेल” असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं होतं. स्मृती मांधना, हरमनप्रीत कौर या खेळाडूंची मॅच फी रोहित शर्मा आणि विराट कोहली इतकीच असेल.

भेदभाव संपवणारा महत्त्वाचा निर्णय

बऱ्याच काळापासून पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान पैसे देण्याची मागणी सुरु होती. बीसीसीआयने ही मागणी आता मान्य केली आहे. बीसीसीआयचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. जय शाह यांनी आपल्या निर्णयाची माहिती देताना सांगितलं की, “मला सांगताना आनंद होतोय, बीसीसीआयचं भेदभावाविरोधात हे महत्त्वपूर्ण पाऊस आहे. कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या खेळाडूंच आम्ही समान वेतन करतोय. आता यापुढे प्रत्येक सान्यात पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान फी मिळेल”

आता प्रत्येक मॅचसाठी किती पैसे मिळणार?

या निर्णयानंतर आता महिला क्रिकेटपटूंना प्रत्येक टेस्ट मॅचसाठी 15 लाख रुपये मिळतील. एका वनडेसाठी महिला क्रिकेटपटूंना 6 लाख आणि एका टी 20 मॅचसाठी 3 लाख रुपये मिळतील.


निर्णयाआधी किती पैसा मिळायचे?

याआधी भारतीय महिला क्रिकेटपटूंना टेस्ट मॅचसाठी 4 लाख रुपये मिळायचे. प्रत्येक वनडे मॅचसाठी 2 लाख आणि टी 20 सामन्यात 2.5 लाख रुपये मिळायचे.