
आयपीएल आता जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीग झाली आहे. सर्व देशांचे खेळाडू सहभागी होतात. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा ओतला जातो. युवा खेळाडूंसाठी आयपीएल मोठं स्टेज आहे, फक्त भारतातीलच नाहीतर परदेशी खेळाडूंसाठी आयपीएल टर्निंग पॉईंट ठरते. अनेक खेळाडू ज्यांच्यासाठी आयपीएलमुळे यशाची शिडी ठरली. मात्र या आयपीएलला 2013 साली डाग लागला. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. कारण टीम इंडियाचा वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडू एस. श्रीसंतसह दोन भारतीय खेळाडूंचा यामध्ये समावेश होता. क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू होती. पण तुम्हाला माहिती का हे स्पॉट फिक्सिंग कशामुळे समोर आलं होतं? अंडरवर्ल्ड डॉन दाऊदमुळे हा काळाबाजार जगासमोर उघडा पडेलला. नेमकं काय झालं होतं जाणून घ्या. दाऊदसाठी तपास, समोर IPL स्पॉट फिक्सिंग महाराष्ट्रात जानेवारी 2013 ला सीबीआयने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) या कायद्या अंतर्गत 42 लोकांवर...