IPL 2022, Hardik Pandhya : हार्दिक पंड्याचा नवा अवतार IPLसाठीच ठिक, दिग्गज खेळाडूनं व्यक्त केलं मत, कोण आहे तो खेळाडू?

| Updated on: Apr 15, 2022 | 4:57 PM

आयपीएलमधील हार्दिक पंड्याची कामगिरी पाहून सध्या हार्दिकची चहुकडे चर्चा आहे. हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर असावं, असं त्याच्या चाहत्यांना वाटतं. मात्र, एका दिग्गज खेळाडूने याला विरोध करत थोडी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा ते दिग्गज क्रिकेटपटू नेमकं काय म्हणालेत.

IPL 2022, Hardik Pandhya : हार्दिक पंड्याचा नवा अवतार IPLसाठीच ठिक, दिग्गज खेळाडूनं व्यक्त केलं मत, कोण आहे तो खेळाडू?
हार्दिक पंड्या
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये अनेक खेळाडू आपल्या चांगल्या कामगिरीची चमक दाखवता आहेत. यातच हार्दिक पंड्याने (Hardik Pandhya) देखील आपल्या कामगिरीची चमक कालच्या सामन्यात दाखवली आहे. हार्दिकचं काम बोलतंय, त्याची फलंदाजी बोलतेय आणि त्यामुळेच तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये हार्दिकचं उत्तम प्रदर्शन दिसून आलंय. त्यामुळे चहुकडे सद्या हार्दिक पंड्याचीच चर्चा आहे. पण, ही चर्चा नेमकी कशाची आहे, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हार्दिक पंड्या सध्या वेगळ्याच अवतारात आहे. तो अवतार म्हणजे त्याची भेदक फलंदाजी. हार्दिक त्याच्या फलंदाजीमुळेच सध्या चांगलाच चर्चे आहेत. हार्दिक पंड्या आयपीएलच्या (IPL) ऑरेंज कॅपच्या यादीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 228 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काढल्या आहेत. त्यामुळे सध्या चहुकडे हार्दिकच हार्दिक आहे. दरम्यान, हार्दिकच्या फलंदाजीच्या स्थानाबद्दल बोलताना ती त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी फलंजीमध्ये त्याचं चौथं स्थान आहे, असं बोललं जातंय. हे महत्वाचं स्थान असलं तरी एका दिग्गज खेळाडूने याच विषयाला धरुन काही गोष्टी सांगितल्या आहेत.

‘हार्दिकला चौथा पर्याय म्हणनं अयोग्य’

आयपीएल 2022मध्ये हार्दिक पंड्याची क्रमांक चारचं नवं फलंदाजीचं स्थान आणि त्याच्या कामगिरीविषयी दिग्गज क्रिकेटपटू सबा करीम यांना विचारण्यात आलं. यावर त्यांचं उत्तर थेट नाही, असं होतं. हार्दिक पंड्याचे चाहते त्याला टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाहू लागले. आता सबा यांचं हे मोठं वक्तव्य हार्दिकसाठी चांगलं नाही. हे हार्दिकच्या चाहत्यांना देखील आवडणार नाही. पण, दिग्गज क्रिकेपटू सबा करीम यांनी असं का म्हटलं, या प्रश्नचं उत्तर जाणून घ्यायला हवं.

सबा करीम काय म्हणाले?

भारताचे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी हार्दिक पंड्याबद्दल बोलताना म्हटलं की, ‘आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे वेगळं आहे.  तुम्ही या दोन्ही गोष्टींना एकत्र करण्याचा प्रयत्न करु नका. कारण, या दोन्ही क्रिकेट सामन्यात खेळाडूचा रोल देखील वेगळा असतो. त्यामुळे हार्दिक पंड्याला टीम इंडियासाठी क्रमांक चारचा पर्याय म्हणणे योग्य ठरणार नाही. जर पुढच्या सामन्यात ऋषभ पंतने शतक काढलं तर पुन्हा तुम्हीच म्हणाल की आता ऋषभला नंबर चारवर खेळायला पाहिजे. त्यानंतर जर कुणी दुसऱ्याने येऊन आपल्या कामगिरीची चमक दाखवली तर तुम्ही पुन्हा म्हणाल आरेरे नाही नाही या खेळाडुला टीम इंडियात चैथ्या क्रमांकावर खेळलं पाहिजे. तर हे योग्य होणार नाही. आंतरराष्ट्रीय संघाची गरज वेगवेगळी असते. त्याची आणि आयपीएलची बरोबरी करणं बिलकूल योग्य नाही.’ अलं सभा करीम म्हणालेत.

इतर बातम्या

Sharad Pawar Live : त्यांच्याकडे बोलायला काही नाही, शरद पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीतल्या ओबीसी, आदिवासी नेत्यांची यादी वाचली, फडणवीस बोलणार?

Pawar On James Laine Controversy : तेही गलिच्छ, शरद पवारांनी जळगावमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा शिवजयंतीवरचा माफीनामा वाचून दाखवला

Sharad Pawar Live : महाराष्ट्रातल्या लोडशेडिंगवर ठाकरे सरकार काय करतंय? पवार म्हणाले पुढच्या 4 दिवसात…