IPL 2022 Mumbai Indian: Rohit sharma आधी स्वत: धावा कर, मग दुसऱ्यांवर संताप दाखव, बुमराहला पहिली ओव्हर न देणं मोठी चूक

| Updated on: Apr 17, 2022 | 12:49 PM

IPL 2022 Mumbai Indian: मैदानात असताना त्याच्या चेहऱ्यावर चिडचिडेपण दिसून येतो. आपल्या खेळाडूंवर भडकण्याआधी रोहित शर्माने स्वत:ची बॅट चालवण सुद्धा तितकच गरजेच आहे.

IPL 2022 Mumbai Indian: Rohit sharma आधी स्वत: धावा कर, मग दुसऱ्यांवर संताप दाखव, बुमराहला पहिली ओव्हर न देणं मोठी चूक
मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्मा
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: IPL 2022 च्या 15 व्या सीजनमध्ये Mumbai Indians चा संघ एकापाठोपाठ एक पराभवांचा सामना करतोय. शनिवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. मुंबईचा हा सहावा पराभव आहे. प्लेऑफ मध्ये दाखल होण्याच्या मुंबई इंडियन्सच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. पॉइंटस टेबलमध्ये मुंबईचा संघ तळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवाची अनेक कारण आहेत. त्यातल एक मुख्य कारण म्हणजे रोहित शर्मा. रोहित शर्मा (Rohit sharma) यंदाच्या सीजनमध्ये बॅटने फ्लॉप ठरतोय. कॅप्टन म्हणून त्याची रणनिती फेल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे पराभवाचा दबाव रोहित शर्माच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय. त्याची अस्वस्थतता, चिडचिडेपणा खेळाडूंवर दिसून येतोय. रोहित शर्मा मैदानात कूल अंदाजात दिसतो. पण यंदाच्या सीजनमध्ये तो वेगळ्याच अवतारात दिसतोय. चूक झाल्यानंतर तो संघातील सहकाऱ्यांना ओरडताना दिसतो.

टीमसमोर आदर्श उदहारण कसं ठेवेल?

मैदानात असताना त्याच्या चेहऱ्यावर चिडचिडेपण दिसून येतो. आपल्या खेळाडूंवर भडकण्याआधी रोहित शर्माने स्वत:ची बॅट चालवण सुद्धा तितकच गरजेच आहे. कॅप्टन जो पर्यंत स्वत: चांगली कामगिरी करणार नाही, तो पर्यंत तो टीमसमोर आदर्श उदहारण कसं ठेवेल?.

रोहितची बॅट कधी तळपणार?

आयपीएल 2022 मध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत. टीम आणि फॅन्ससाठी हा चिंतेचा विषय आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने 32 चेंडूत 41 धावा करुन चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्याची बॅटच तळपली नाही. राजस्थान विरुद्ध 10, कोलकाता विरुद्ध 3, आरसीबी विरुद्ध 26, पंजाब किंग्स विरुद्ध 28 आणि लखनौ विरुद्ध 6 अशी रोहितची कामगिरी आहे. रोहित शर्माने सहा सामन्यात 19 च्या सरासरीने फक्त 114 धावा केल्या आहेत.

बुमराहला पहिली ओव्हर का नाही दिली?

लखनौ विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माने संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली. आयपीएलमध्ये रोहित शर्माची कॅप्टनशिप साधारण वाटत आहे. गोलंदाजीत त्याने केलेला बदल संघाला महाग पडलेत. जसप्रीत बुमराह वगळता मुंबई इंडियन्सचा एकही गोलंदाज चांगली कामगिरी करत नाहीय. टायमल मिल्स, बसिल थम्पी, मुरुगन अश्विन, डॅनियल सॅम्स यांची गोलंदाजी खूपच साधारण वाटली. जसप्रीत बुमराहला सुद्धा रोहित शर्मा योग्य पद्धतीने हाताळत नाहीय. लखनौ विरुद्धच्या सामन्यात रोहितने जसप्रीत बुमराहला पहिलं षटक दिलं नाही. ती एक चूक होती. कारण लखनौचा कॅप्टन केएल राहुल पहिल्या ओव्हरमध्ये संघर्ष करतो. या सीजनमध्ये राहुल दोन वेळा पहिल्या बॉलवर आऊट झाला आहे. काल केएल राहुलचं शतक मुंबई इंडियन्सला भारी पडलं.