AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Mumbai Indians: ‘इशान किशनवर 15.25 कोटी रुपये वाया घालवले, तेच पराभवाचं कारण’, मोठ्या क्रिकेटपटूचं परखड विश्लेषण

IPL 2022 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ सध्या प्रचंड खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सचा हा सर्वात वाईट सीजन असेल. एकापाठोपाठ एक असे मुंबई इंडियन्सने सहा सामने गमावले आहेत.

IPL 2022 Mumbai Indians: 'इशान किशनवर 15.25 कोटी रुपये वाया घालवले, तेच पराभवाचं कारण',  मोठ्या क्रिकेटपटूचं परखड विश्लेषण
इशान किशनImage Credit source: PTI
| Updated on: Apr 17, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ सध्या प्रचंड खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सचा हा सर्वात वाईट सीजन असेल. एकापाठोपाठ एक असे मुंबई इंडियन्सने सहा सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. पण सध्या त्यांना त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नाहीय. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सच नेमकं काय चुकतय? या बद्दल क्रिकेट तज्ज्ञांनी आता वेगवेगळी मत मांडायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू शेन वॅटसन (Shane Watson) याच्यामते मुंबई इंडियन्सने इशान किशनवर 15.25 कोटी रुपये वाया घालवले. इशान किशन (Ishan Kishan) एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. पण मुंबई इंडियन्सने एवढी मोठी रक्कम त्याच्या एकट्यावर खर्च करुन संघाच्या क्वालिटीशी तडजोड केली, असं वॅटसनचं मत आहे.

कोणाला रिटेन केलं होतं?

मेगा ऑक्शनआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. इशान किशनला मुंबईने रिटेन केलं नव्हतं. त्यामुळे मेगा ऑक्शनच्यावेळी त्याला रिटेन करण्यासाठी मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम खर्च केली. तीच रणनिती चुकली, असं वॅटसनचं मत आहे.

संपूर्ण पगार खर्च करावा, एवढी त्याची योग्यता नाही

“मुंबई इंडियन्स आज पॉइंटस टेबलमध्ये तळाला आहे, याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. कारण ऑक्शनच्यावेळी त्यांनी काही धक्कादायक निर्णय घेतले होते. इशान किशनवर खूप पैसा खर्च केला. तो प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्याकडे कौशल्य आहे. पण तुम्ही तुमचा संपूर्ण पगार त्याच्यावर खर्च करावा, एवढी त्याची योग्यता नाही. त्यानंतर जोफ्रा आर्चरला विकत घेतलं. तो पुन्हा खेळायला येणार की, नाही हे सुद्धा माहित नाही. तो बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळलेला नाही. असे काही कमकुवत दुवे या टीममध्ये आहेत” असं शेन वॉटसनने सांगितलं.

कुठल्या टीम्सनी मुंबई इंडियन्सला पराभूत केलं?

आयपीएल 2022 च्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवाने मुंबई इंडियन्सची सुरुवात झाली होती. त्यानंतर राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स आणि काल लखनौ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सचा संघ पराभूत झाला. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या स्थानी आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.