AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC, IPL 2022: रोहितच्या मुंबईसमोर दिल्लीचं आव्हान, ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाचा आज कस लागणार? कारण…

MI vs DC : बंगळुरुच्या होणाऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ काहीसा कमकुवत होण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीचे स्टार प्लेअर्स या सामन्याला मुकणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसाठीही काहीशी चिंता वाढवणारा मुद्दा ठरणार आहे, तो म्हणजे...

MI vs DC, IPL 2022: रोहितच्या मुंबईसमोर दिल्लीचं आव्हान, ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाचा आज कस लागणार? कारण...
कोण कुणावर भारी पडणार?Image Credit source: Prokerala
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Mar 27, 2022 | 1:56 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये कोलकातानं बलाढ्य चेन्नईला पराभवाची धूळ चारली. आता उत्सुकता रविवारच्या डबल हेडरची आहे. आज मुंबई इंडियन्सचा संघ दिल्लीशी (MI vs DC) भिडणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली मैदानात उतरले. तर दिल्लीचा संघ ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टन्सीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. या सामन्याची उत्सुकता दिल्ली आणि मुंबईसह आयपीएलच्या सगळ्यांच चाहत्यांमध्ये आहेत. कारण या दोन्ही संघांनी मागच्या आयपीएलमध्ये एकमेकांना जोरदार टक्कर दिली होती. पहिला डबर हेडर सामना हा मुंबई आणि दिल्लीच्या संघातच होणार आहे. दुपारी सुरु होणाऱ्या या सामन्यात कुणाचं पारडं जड ठरणार, हे आज स्पष्ट होईल. सर्वाधिक बोली लावलेल्या ईशान किशनच्या कामगिरीकडे या सामन्यात सगळ्यांचं लक्ष असेल. ईशान किशनला मुंबईनं तब्बल 15.25 इतकी तगडी रक्कम देऊन रिटेन केलं होतं. बंगळुरुच्या होणाऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ काहीसा कमकुवत होण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीचे स्टार प्लेअर्स या सामन्याला मुकणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसाठीही काहीशी चिंता वाढवणारा मुद्दा ठरणार आहे, तो म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये नेमका खेळ कसा सांभाळायचा?

कसा असेल मुंबईचा संघ?

रोहित शर्माकडे यंदाचा आयपीएलचा सगळ्यात महागडा खेळाडू आहे. तो म्हणजे ईशान किशन. ईशान किशन गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्मात आहेत. ईशान यावेळी रोहित सोबत ओपनिंग करताना दिसेल. मुंबईच्या संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. मुंबईच्या संघाची रणनिती त्यामुळे या सीझनमध्ये नेमकी कशी राहते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सूर्यकुमार नसताना मुंबईच्या मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्मा, अमनमोलप्रीत सिंह किंवा डेवॉल्ड ब्रेविस, पोलार्ड, टीम डेविड आणि संजय यादव यांच्या खांद्यावर जबाबदारी येणार आहे. तर दुसरीकडे बुमराहसह मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकटसह संजय यादवचाही फिरकीपटू म्हणूनही पाहायला मिळू शकतो.

दिल्लीचे 5 विदेशी खेळाडू नाहीत

वेगवेगळ्या क्रिकेट मालिका आणि सीरिजमुळे दिल्लीचे दिग्गज पाच खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. यात डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्स यांची उणिव ऋषभ पंतला भासू शकते. सध्या पाकिस्तानातीली दौऱ्यामुळे हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. 10 एप्रिलपासून ते संघासोबत सोडले जाणार आहेत.

तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे लुंगी एनगिडी आणि बांगलादेशचे मुस्ताफिजुर रहमानही वेगळ्या सीरिजमध्ये खेळत आहेत. त्यामुळे ऋषभ पंतसाठी आजचा सामना आव्हानात्मक असणार आहेत. इतकंच काय तर घायाळ झालेल्या एनरिक नॉर्खिया पहिल्या सामन्याला मुकणार आहे. एनरिक नॉर्खिया हा एक फास्ट बॉलर असून तो दिल्लीच्या संघासाठी फार महत्त्वाचा आहे. या सगळ्या दिग्गजांच्या गैरहजेरीच ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाचाही कस लागेल.

असा असू शकेल मुंबईचा संघ!

  1. ईशान किशान (विकेटकिपर)
  2. रोहित शर्मा (कर्णधार)
  3. तिलक वर्मा
  4. अमनमोलप्रीत सिंह/डेवॉल्ड ब्रेविस
  5. कीरोन पोलार्ड
  6. टिम डेविड
  7. संजय यादव
  8. टायमल मिल्स
  9. जयदेव उनादकट
  10. मुरुगन अश्विन
  11. जसप्रीत बुमराह

पाहा रोहित शर्मा काय म्हणाला?

दिल्लीची टीम अशी असू शकते!

  1. पृथ्वी शॉ
  2. टिम शिफर्ट
  3. केएस भरत/मंदीप सिंह
  4. ऋषभ पंत (विकेटकिपर आणि कर्णधार)
  5. रोवमैन पावेल
  6. ललित यादव
  7. अक्षर पटेल
  8. शार्दुल ठाकुर
  9. कुलदीप यादव
  10. खलील अहमद
  11. कमलेश नागरकोटी/चेतन साकरिया

IPLच्या इतर बातम्या :

CSK vs KKR, IPL 2022: कॅप्टन होताच Ravindra Jadeja च्या चुकीमुळे CSKचं मोठं नुकसान! पहिल्याच सामन्यात फटका

IPL 2022 : ‘तो आजारातून पूर्णपणे बराही झाला नव्हता, तरीही…’ : CSKच्या शिबिरापूर्वी काय घडलं? इरफान पठाणनं सांगितला किस्सा

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतरही चमकला ड्वेन ब्राव्हो, लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी

Follow Us
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन