IPL 2022 New Rules: DRS ते सुपर ओव्हरपर्यंत बदलले नियम, ‘या’ चार बदलांमुळे IPL अधिक रोमांचक

| Updated on: Mar 15, 2022 | 4:31 PM

IPL 2022 New Rules: IPL 2022 यंदाचा इंडियन प्रिमियर लीगचा (IPL) 15 वा सीजन असून 26 मार्चपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) होणार आहे.

IPL 2022 New Rules: DRS ते सुपर ओव्हरपर्यंत बदलले नियम, या चार बदलांमुळे IPL अधिक रोमांचक
आयपीएल 2022
Follow us on

IPL 2022: यंदाचा इंडियन प्रिमियर लीगचा (IPL) 15 वा सीजन असून 26 मार्चपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेला सुरुवात होण्याआधी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. बदलेले नियम कोविड-19, डीआरएस आणि सुपर ओव्हरशी संबंधित आहेत. या नव्या नियम बदलांमुळे आयपीएल स्पर्धा अधिक रोमांचक होईल. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 10 संघ आहेत. याआधी आठ टीम्स होत्या. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये आहेत. आतायपीएलच्या आतापर्यंतच्या 14 सीजन्समध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन सर्वात यशस्वी संघ आहेत.

  1. कोरोनामुळे 12 खेळाडूंटी टीम बनत नसेल मग काय? – प्लेइंग कंडीशन्सबद्दल बीसीसीआयने नियम बदलला आहे. कोविड-19 मुळे संघ मैदानावर उतरू शकला नाही, तर त्याच्याशी संबंधित हा नियम आहे. कोरोनामुळे 12 खेळाडूंचा संघ बनत नसेल, तर अशा स्थितीमध्ये BCCI मॅच री-शेड्यूल करण्याचा प्रयत्न करेल. हे शक्य नसेल, तर आयपीएलच्या टेक्निकल कमिटीकडे विषय पाठवला जाईल. तेच याबद्दल अंतिम निर्णय घेतील. क्रिकबजने हे वृत्त दिलं आहे.
  2. आधी काय होतं– मॅच शेड्यूल होत नसेल, तर प्लेइंग इलेवन मैदानावर उतरवू न शकणाऱ्या संघाला पराभूत घोषित केले जायचे. अशा स्थितीत प्रतिस्पर्धी संघाला दोन पॉईंटस मिळायचे. पण आता असे होणार नाही.
  3. मॅचमध्ये चार DRS – BCCI ने मेरिलबोन क्रिकेट क्लबने जाहीर केलेल्या नवीन नियमांचे समर्थन केले आहे. आयपीएलमध्ये डिसीजन रीव्यू सिस्टिम म्हणजे चार DRS घेता येतील. प्रत्येक डावात दोन संघांना 2-2 DRS घेता येतील.
  4. सुपर ओव्हरमध्ये बदल – बोर्डाने सर्वात मोठा बदल सुपर ओव्हरमध्ये केला आहे. नव्या नियमानुसार प्लेऑफ किंवा फायनलमध्ये सुपर ओव्हर टाकणं शक्य झालं नाही किंवा सुपर ओव्हरही टाय झाली, तर निकालासाठी लीग स्टेजमधील पॉईंटस टेबलचा आधार घेतला जाईल. पॉईंटस टेबलमध्ये सरस असणाऱ्या टीमला विजयी घोषित केलं जाईल. पॉईंटस टेबलमध्ये जो संघ अव्वल असेल, तो विजेता ठरेल. सामना टाय झाल्यानंतर सुपरओव्हरचा आधार घेतला जातो.
  5. नवीन फलंदाज आणि कॅचचा नियम –  BCCI ने मेरिलबोन क्रिकेट क्लबने कॅच संदर्भात केलेल्या नव्या नियमाला मान्यता दिली आहे. नव्या नियमानुसार कुठलाही फलंदाज झेलबाद झाला, तर नवीन फलंदाज स्ट्राइक घेईल. कॅच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतली, असेल तर स्ट्राइक बदलली जाईल.