IPL 2022: कोलकात्यात वादळ, पाऊस, एलिमिनेटरचा सामना झाला नाही, तर RCB न खेळताच बाहेर

| Updated on: May 23, 2022 | 1:39 PM

IPL 2022: गुजरात आणि राजस्थान सामन्या दरम्यान एका चेंडूचाही खेळ झाला नाही, तर हार्दिक पंड्याच्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.

IPL 2022: कोलकात्यात वादळ, पाऊस, एलिमिनेटरचा सामना झाला नाही, तर RCB न खेळताच बाहेर
गुजरात टिटन्स आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: IPL 2022 मध्ये प्लेऑफ राऊंड मंगळवारपासून सुरु होईल. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये क्वालिफायरचा पहिला सामना होईल. त्यानंतरल लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (LSG vs RCB) एलिमिनेटरचा दुसरा सामना होईल. या सामन्याआधी BCCI ने मोठी घोषणा केली आहे. प्लेऑफ सामन्यांच्या नियमांसंबंधी ही घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल 2022 च्या नव्या नियमानुसार, प्लेऑफचे सामने सुरु असताना, खराब वातावरणामुळे अडथळा निर्माण झाला, वेळेवर सामना सुरु होऊ शकला नाही, तर विजेता सुपर ओव्हरमधून निवडला जाईल. काही कारणांमुळे सामन्यात व्यत्यय आला, तर 6-6 चेंडूंचा सामना होईल. पाऊस किंवा अन्य कारणांमुळे मैदानावर सामनाच झाला नाही, तर लीग स्टेजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.

कोलकात्यात वादळ आणि पाऊस

म्हणजे गुजरात आणि राजस्थान सामन्या दरम्यान एका चेंडूचाही खेळ झाला नाही, तर हार्दिक पंड्याच्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल. कारण लीगमध्ये गुजरातचा संघ टॉपवर आहे. लखनौ-बँगलोर सामन्यामध्येही एका चेंडूचाही खेळ झाला नाही, तर RCB चा संघ एक चेंडूही न खेळता बाहेर होईल. आयपीएलचा पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटरचा सामना कोलकातामध्ये होणार आहे. तिथे सध्या वातावरण चांगलं नाहीय. मागच्या दोन दिवसांपासून तिथे वादळ आणि पाऊस कोसळत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत असंच वातावरण रहाण्याची शक्यता आहे.

प्लेऑफचे सामने उशिराने सुरु होऊ शकतात

तीन प्लेऑफ सामने सुरु व्हायला उशीर होणार असेल, तर त्यासाठी सुद्धा नियम आहे. नियमानुसार, सामना रात्री 9.40 पर्यंत सुरु होऊ शकतो. खराब वातावरणामुळे विलंब होणार असेल, तर 10.10 वाजता सुद्धा सामना सुरु होऊ शकतो. फायनलची वेळ रात्री 8 वाजताची आहे. फायनल सामन्यात एका चेंडूचाही खेळ झाला नाही, तर एक रिझर्व्ह दिवस राखून ठेवण्यात आला आहे. दोन क्वालिफायर आणि एलिमिनेटरसाठी कुठलाही रिझर्व्ह दिवस नाहीय. क्वालिफायर आणि एलिमिनेटरच्या सामन्यात पहिला डाव झाल्यानंतर दुसऱ्या डावात पाऊस आला, तर डकवर्थ लुइस नियमाच्याआधारे विजेता संघ ठरवला जाईल.

फायनल मॅच दोन दिवसही चालेल

पावसाने IPL 2022 च्या फायनलमध्ये व्यत्यय आणला, तर रिझर्व्ह डे म्हणजे दुसऱ्यादिवशी जिथे सामना थांबला होता, तिथून सुरुवात होईल. फायनलमध्ये टॉस नंतर एक चेंडूचाही खेळ होऊ शकला नाही, तर दुसऱ्यादिवशी पुन्हा नव्याने टॉस होईल.