IPL 2022 मध्ये हर्षल Riyan Parag च्या अंगावर का धावून गेला? त्याचं खर कारण आलं समोर, मोहम्मद सिराजच नाव घेतलं

| Updated on: Jun 05, 2022 | 4:48 PM

तो म्हणजे रियान पराग. कधी फिल्डिंगसाठी तर कधी आक्रमकतेसाठी, त्याची बरीच चर्चा झाली. रियान परागने (Riyan Parag) या सीजनमध्ये सर्वाधिक झेल घेतले. पण त्यापेक्षा पण हर्षल पटेल बरोबर झालेल्या राड्यासाठी तो जास्त चर्चेत राहिला.

IPL 2022 मध्ये हर्षल Riyan Parag च्या अंगावर का धावून गेला? त्याचं खर कारण आलं समोर, मोहम्मद सिराजच नाव घेतलं
Harshal patel-Riyan parag Fight
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ यंदाच्या सीजनमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) फायनलमध्ये पोहोचला होता. 2008 नंतर पहिल्यांदा राजस्थानची टीम फायनलमध्ये दाखल झाली होती. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघाला विजेतेपद मिळवता आलं नाही. पण या टीमचं कौतुक बरच झालं. या टीममधील एका खेळाडू बराच चर्चेत होता. तो म्हणजे रियान पराग. कधी फिल्डिंगसाठी तर कधी आक्रमकतेसाठी, त्याची बरीच चर्चा झाली. रियान परागने (Riyan Parag) या सीजनमध्ये सर्वाधिक झेल घेतले. पण त्यापेक्षा पण हर्षल पटेल बरोबर झालेल्या राड्यासाठी तो जास्त चर्चेत राहिला. मैदानावर हर्षल पटेल रियान परागच्या अंगावर धावून गेला होता. पण राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूने हस्तक्षेप करुन हर्षल पटेलला थांबवलं होतं. आता रियान परागने या वादावर आपलं मौन सोडलं आहे.

हर्षल पटेलची गोलंदाजी फोडून काढली

26 एप्रिलला बँगलोर आणि राजस्थान सामन्यादरम्यान हा वाद झाला. राजस्थानची इनिंग संपल्यानंतर हर्षल आणि रियानमध्ये वादावादी झाली होती. दोघे परस्पराबरोबर भांडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. परागने त्या मॅचमध्ये हर्षल पटेलची गोलंदाजी फोडून काढली होती.

हे आहे भांडणाच खरं कारण

क्रिकफिटव्दारा इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हर्षल पटेलने आपली बाजू मांडली आहे. “मागच्या 2021 च्या सीजममध्ये मुंबईता आमचा RCB विरुद्ध सामना होता. त्यावेळी त्याने मला आऊट केलं होतं. मी गपचूप मैदानातून बाहेर जात होतो. त्यावेळी हर्षलने हातानेच चल निघं, असा मला इशारा केला होता. मी ते हॉटेलमध्ये जाऊन बघितलं आणि ती गोष्ट माझ्या चांगली लक्षात राहिली. मी या सीजनमध्ये लास्ट ओव्हरमध्ये त्याच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्यावेळी मी तोंडाने काहीच बोललो नाही. मी सुद्धा हातानेच इशारा केला. मी तोंडानेच काहीच बोललो नाही. शिवी सुद्धा दिली नाही. बस आमच्यात इतकंच घडलं होतं. त्यानंतर मला हर्षलने नाही, तर मोहम्मद सिराजने बोलावलं. ‘इथे ये, लहान मुलगा आहेस, तर तसाच रहा’ असं त्याने म्हटलं”

रियान परागने त्या सामन्यात किती धावा केल्या?

हर्षल पटेल बरोबर राडा झाला, त्या सामन्यात रियान परागने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 31 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. त्याने तीन चौकार आणि चार षटकार फटकावले. हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात त्याने 18 धावा फटकावल्या होत्या. परागची खेळ राजस्थानसाठी उपयुक्त ठरली. त्यांनी 144 धावा केल्या. बँगलोरच्या टीमने या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त 115 धावाच केल्या. राजस्थानने 29 धावांनी ही मॅच जिंकली होती.