RCB vs RR IPL 2022: हर्षल पटेल रियान परागच्या अंगावर धावून गेला, भर मैदानात राडा, पहा VIDEO

RCB vs RR IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा गोलंदाज हर्षल पटेल आणि रियान परागमध्ये मैदानावर जोरदार वादावादी झाली. रियान परागने शेवटची ओव्हर टाकणाऱ्या हर्षल पटेलची गोलंदाजी फोडून काढली.

RCB vs RR IPL 2022: हर्षल पटेल रियान परागच्या अंगावर धावून गेला, भर मैदानात राडा, पहा VIDEO
Harshal patel-Riyan parag Fight Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 10:12 PM

मुंबई : पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RCB vs RR) सामना सुरु आहे. आजचा 39 वा सामना आहे. या मॅचमध्ये आज राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीत तो दम दिसला नाही. जोस बटलर, (Jos buttler) देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसनसारखे आक्रमक फलंदाज असूनही राजस्थानला निर्धारित 20 षटकात आठ बाद 144 धावाच करता आल्या. राजस्थानकडून रियान परागने (Riyan parag) एकाकी झुंज दिली. त्याने एकट्याने खिंड लढवली. त्यामुळे राजस्थानला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. रियाने परागने 31 चेंडूत 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. अत्यंत अवघड परिस्थितीत त्याने उत्तम फलंदाजी केली. त्याच्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार होते. रियान परागने आज दमदार प्रदर्शन केलं व डावाचा शेवट त्याच्यासाठी चांगला झाला नाही. एका वादाचं गालबोट लागलं.

मैदानावर राडा

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा गोलंदाज हर्षल पटेल आणि रियान परागमध्ये मैदानावर जोरदार वादावादी झाली. रियान परागने शेवटची ओव्हर टाकणाऱ्या हर्षल पटेलची गोलंदाजी फोडून काढली. त्याने 18 धावा लुटल्या. त्यामुळे हर्षल पटेलचा पारा अधिकच चढला.

काहीतरी बोलला म्हणून तो मागे फिरला

रियान पराग डाव संपल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता. त्यावेळी हर्षल पटेल काहीतरी बोलला म्हणून तो मागे फिरला. दोघांची शाब्दीक बाचबाची सुरु होती. तितक्यात हर्षल पटेल धावून रियानच्या अंगावर गेला. पण राजस्थान एका खेळाडूने मध्यस्थी करत हर्षलला थांबवलं व वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

बटलरकडून निराशा

राजस्थानकडून आज अपेक्षित फलंदाजी झाली नाही. जोस बटलर खूपच लवकर आऊट झाला. जोस बटलरची बॅट आज तळपली नाही. त्याचा परिणाम आज राजस्थानच्या संघाच्या कामगिरीतून दिसून येतोय. RCB विरुद्ध जोस बटलरने नऊ चेंडूत फक्त आठ धावा केल्या. त्याने फक्त एक चौकार लगावला. IPL 2022 च्या पीचवर बटलरची ही आठवी इनिंग होती. 88.88 त्याचा स्ट्राइक रेट होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.