IPL 2022: ‘Rohit Sharma ला आधी बाहेर काढा’, टिम डेविडवरुन मुंबई इंडियन्सच्या स्ट्रॅटजीवर भडकला वीरेंद्र सेहवाग

| Updated on: May 22, 2022 | 1:04 PM

वीरेंद्र सेहवाग क्रिकबज युट्यूब चॅनलवर हे म्हणाला. तिथे चर्चा करण्यासाठी पॅनलवर अजय जाडेजा सुद्धा होता. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा सामना संपल्यानंतर चर्चा झाली.

IPL 2022: Rohit Sharma ला आधी बाहेर काढा, टिम डेविडवरुन मुंबई इंडियन्सच्या स्ट्रॅटजीवर भडकला वीरेंद्र सेहवाग
sehwag-rohit
Image Credit source: twitter/PTI
Follow us on

मुंबई: Mumbai indians ने काल दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून मोसमाचा शेवट गोड केला. मुंबईचं या मोसमातील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. मुंबईचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं. त्यामागे अनेक कारणं आहेत. यातील एक मुख्य कारण म्हणजे टिम डेविड बद्दलची मुंबईची थिंक टँक स्ट्रॅटजी. मुंबई इंडियन्सने Tim David ला 8.25 कोटी रुपये खर्चून विकत घेतलं होतं. मुंबईने डेविडला सुरुवातीचे दोन सामने खेळवलं. त्यानंतर पुढचे सहा सामने बेंचवर बसवून ठेवलं. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सची ही स्ट्रॅटजी Virendra Sehwag ला अजिबात पटलेली नाही. टिम डेविडला न खेळवण्याच्या रणनितीवर वीरेंद्र सेहवागने बोट ठेवलं. त्याने रोहित शर्मावर टीका केली. टिम डेविड फेल असेल, तर त्या हिशोबाने रोहित शर्मालाही बाहेर केलं पाहिजे.

वीरेंद्र सेहवाग क्रिकबज युट्यूब चॅनलवर हे म्हणाला. तिथे चर्चा करण्यासाठी पॅनलवर अजय जाडेजा सुद्धा होता. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा सामना संपल्यानंतर चर्चा झाली. टिम डेविडचा विषय आला, त्यावेळी अजय जाडेजाने आपलं मत मांडलं. त्यानंतर वीरेंद्र सेहवागने भाष्य केलं.

अजय जाडेजा टिम डेविडबद्दल म्हणाला…

“मुंबई इंडियन्सने टिम डेविडवर विश्वास ठेवायला पाहिजे होता. त्यांनी विश्वास ठेवला असता, तर तो सरप्राइज पॅकेज ठरला असता. जर बाहेर बसवायचच होतं, तर त्याला विकत का घेतलं?. इतके कोट्यावधी रुपये का खर्च केले?” असं अजय जाडेजा म्हणाला.

हे सुद्धा वाचा

रोहित शर्माने काय केलं?

“मुंबई इंडियन्सने टिम डेविड करुन भरपूर अपेक्षा ठेवल्या होत्या. पण त्यासाठी त्याला संधी द्यायला पाहिजे होती. एखाद्या खेळाडूला ड्रॉप करण्याआधी त्याला इतकी संधी द्या की, तो स्व:चा बोलला पाहिजे, मला आता जमत नाहीय” असं सेहवान म्हणाला.

सेहवागच्या मते, “टिम डेविडला दोन सामने खेळवून ड्रॉप केलं, असेल तर त्या हिशोबाने रोहित शर्मालाही बाहेर बसवायला पाहिजे होतं. त्याने 30-40 धावा करुन मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला नाही. टिम डेविड छोटी पण कमीत कमी मॅच विनिंग इनिंग तर खेळला”