IPL 2023 : पाच कर्णधारांना शिक्षा… हार्दिक पंड्या, केएल राहुलसहीत सर्वांवर बंदी येणार?; किती सामन्यांसाठी बॅन?

| Updated on: Apr 21, 2023 | 7:10 AM

आयपीएलमधील पाच कर्णधारांवर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार आहे. स्लो ओव्हर रेटमुळे या पाचही कर्णधारांना आधीच दंड ठोठावण्यात आला आहे.

IPL 2023 : पाच कर्णधारांना शिक्षा... हार्दिक पंड्या, केएल राहुलसहीत सर्वांवर बंदी येणार?; किती सामन्यांसाठी बॅन?
IPL 2023
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : आयपीएल 2023चा सीझन दणक्यात सुरू आहे. क्रिकेटप्रेमीही क्रिकेटची मजा लुटताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे आयपीएलमधील अर्ध्या डझन कर्णधारांवर बॅनची टांगती तलवार लटकलेली आहे. अजून दोनवेळा चुका केल्या की या कर्णधारांवर बंदी घातली जाऊ शकते. हार्दिक पंड्या, फाफ डु प्लेसी, संजू सॅमसन, केएल राहुल आदी कर्णधारांवर बॅनची टांगती तलवार आहे. या कर्णधारांच्या टीम आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करत आहेत. अशावेळी या कर्णधारांवर बॅन आल्यास या संघाना मोठा झटका बसू शकतो.

गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पंड्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, एका सामन्यात रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणारा सूर्यकुमार यादव आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांना स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे या कर्णधारांना केवळ 12 लाखांचा दंड ठोठावलेला नाही तर त्यांना सक्त ताकीदही देण्यात आलेली आहे. या चुकीनंतर पुन्हा या संघानी त्याच चुका दोन वेळा केल्यास थेट कर्णधारांवरच बॅन येणार आहे. त्यामुळे या सर्व पाचही कर्णधारांना सतर्क राहावे लागणार आहे. सर्व संघांनी पहिल्यांदाच चूक केली होती. त्यामुळे कर्णधारांना दंड ठोठावण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

नियम काय सांगतो?

निर्धारीत वेळेत षटकं न टाकल्याने कर्णधारांना शिक्षा मिळाली आहे. या संघानी पुन्हा तीच तीच चूक केली तर संपूर्ण संघाला दंड ठोठावण्यात येईल आणि कर्णधाराला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम वाढवून 24 लाख होईल. तर इतर खेळाडूंना सामन्याची 25 टक्के फी दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

तिसरी चूक झाल्यास कर्णधाराला 30 लाखाचा दंड आणि एका सामन्यासाठी बॅन लागू शकतो. तर प्लेइंग इलेवनच्या इतर 10 खेळाडूंना त्यांच्या मानधनातून 50 टक्के दंड आकारण्यात येईल. त्यामुळे येणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात या संघांना सावध राहावं लागणार आहे.

राहुलला दंड

राजस्थानवर विजय मिळाल्यानंतर केएल राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलला 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊच्या संघाने राजस्थान रॉयल्स विरोधात खेळताना वेळेवर षटकं टाकली नाहीत. त्यामुळे कर्णधार राहुलला हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळो येणाऱ्या प्रत्येक सामन्यात राहुलला ओव्हर रेटकडे लक्ष द्यावे लागणार आहे. दुसऱ्यांदा ही चूक झाली तर हा दंड केवळ कर्णधारालाच नाही तर सर्व संघाला लागेल. मात्र, तिसऱ्यांदा चूक झाली तर नियमानुसार कर्णधारावर एका मॅचची बंदी येयेण्याची शक्यता आहे.