
मुंबई: सर्व IPL फ्रेंचायजी 23 डिसेंबरला कोच्चीमध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनच्या तयारीत व्यस्त आहेत. मागच्याच महिन्यात फ्रेंचायजींनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. मिनी ऑक्शनच्या माध्यमातून अपेक्षित संघ उभारणीवर सर्वांच लक्ष आहे. ऑक्शनमध्ये ऑलराऊंडर्सना नेहमीच जास्त मागणी असते. ऑलराऊंडर्सवर नेहमी पैशांचा पाऊस पडतो. पुन्हा एकदा फ्रेंचायजीच्या नजरा ऑलराऊंडर्सवर आहेत. या ऑक्शनमध्ये 3 ऑलराऊंडर्स उतरणार आहेत. त्यांच नशीब पालटणं निश्चित आहे.
या 3 ऑलराऊंडर्सना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मिनी ऑक्शनमध्ये फ्रेंचायजींमध्ये चुरस पहायला मिळेल. अशावेळी पैशांचा पाऊस पडणं निश्चित आहे.
‘या’ खेळाडूला 10 कोटीपेक्षा जास्त मिळतील
ऑलराऊंडर्समध्ये सर्वात जास्त मागणी बेन स्टोक्सला असेल. मागची 2 वर्ष स्टोक्स आयपीएलपासून लांब होता. स्टोक्स क्रिकेट विश्वातील या महागड्या लीगमध्ये पुन्हा पुनरागमन करतोय. त्याने इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्टोक्ससारखा खेळाडू आपल्या ताफ्यात असावा, यासाठी फ्रेंचायजींनी रणनिती बनवली असेल. स्टोक्सला या मिनी ऑक्शनमध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.
वेगाने धावा करण्याची क्षमता
बेन स्टोक्सनंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनचा नंबर येतो. ज्याने 2020 मध्ये भारताविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये डेब्यु केला. त्याची वेगवान फलंदाजी भारतीयांना सुद्धा आवडते. ग्रीन आता 23 वर्षांचा आहे. पुढची 10 वर्ष तो कुठल्याही फ्रेंचायजीला देऊ शकतो. वेगाने धावा करण्याबरोबर तो गोलंदाजी सुद्धा करु शकतो.
वर्ल्ड कपमधल्या चांगल्या कामगिरीचा त्याला होणार फायदा
इंग्लंडचा सॅम करन सुद्धा सर्वाधिक पैसा मिळवणाऱ्या ऑलराऊंडर्समध्ये असू शकतो. आयपीएलमध्ये त्याला चांगली डिमांड असेल. मागच्या सीजनमध्ये दुखापतीमुळे तो सहभागी झाला नाही. यावेळी फ्रेंचायजी त्याच्यावर बोली लावण्यासाठी सज्ज आहेत. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं. त्ंयाचा फायदा त्याला ऑक्शनमध्ये मिळेल. वर्ल्ड कपच्या 6 सामन्यात त्याने 13 विकेट घेतल्या. तो चांगल्या फिनिशरची भूमिका बजावू शकतो.