IPL Final 2023 : ‘फायनलमध्ये झालेल्या पराभवामुळे माझ्या मनात त्या रात्री…’; मोहित शर्माचा मोठा खुलासा!

| Updated on: May 31, 2023 | 8:45 PM

IPL Final 2023 : आयपीएल फायनलची रात्र सर्वांच्या कायम स्मरणात राहिल कारण सीएसकेने पाचव्यांदा विजेतेपद जिंकलं होतं. मात्र ते दोन बॉल गोलंदाज मोहित शर्माला झोपू देत नव्हते.

IPL Final 2023 : फायनलमध्ये झालेल्या पराभवामुळे माझ्या मनात त्या रात्री...; मोहित शर्माचा मोठा खुलासा!
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 च्या फायनलची ओव्हर सर्वांच्या कायम  लक्षात राहणारी असेल, कारण मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली होती. चेन्नईचा बिग हिटर शिवम दुबे आणि स्टार ऑल राउंडर रविंद्र जडेजा  मैदानात होते आणि 6 चेंडूत 13 धावांची गरज होती. जडेजा आणि शिवमला पहिल्या चार बॉलमध्ये मोहित शर्मा याने अवघ्या 3 धावा करू दिल्या. सामना फिरला असं वाटत होत मात्र दोन चेंडूंवर मारले गेलेले सिक्सर आणि चौकार अन् गुजरातचं चॅम्पिअन होण्याचं स्वप्न भंगलं. हा फक्त पराभव नव्हता कारण संपूर्ण सीझनची मेहनत वाया गेली होती. मोहित शर्मा याने तर कमाल गोलंदीज केली होती. फक्त त्या दोन मोठ्या फटक्यांमुळे चित्र पालटलं होतं.

मोहित शर्मा याने यंदाच्या सीझनमध्ये पदार्पण केलं होतं.  डेथ ओव्हर्समध्ये इतर गोलंदाज महागडे ठरत होते मात्र भावाने आपल्या गोलंदाजीने गुजरातला मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवून दिल्या होत्या. आयपीएल फायनलची रात्र सर्वांच्या कायम स्मरणात राहिल कारण सीएसकेने पाचव्यांदा विजेतेपद जिंकलं होतं. मात्र ते दोन बॉल गोलंदाज मोहित शर्माला झोपू देत नव्हते.

काय म्हणाला मोहित शर्मा?

मला रात्री झोप येत नव्हती. त्यावेळी मी कोणता बॉल टाकायला हवा होता जेणेकरून मॅच जिंकली असती, हा विचार रात्रभर माझ्या मनात येत होता. तसं शेवटच्या ओव्हरमध्ये माझी रणनिती स्पष्ट होती की अचूक यॉर्कर टाकायचे. मी नेटमध्ये त्याचा भरपूर सराव केला होता त्यामुळे मी यॉर्कर टाकले असल्याचं मोहित शर्माने सांगितलं.

पहिले चार चेंडू बरोबर पडले पण शेवटचे दोन चेंडू ज्या जागी पडायला नको होते त्या ठिकाणी पडले. जडेजाने शेवटच्या चेंडूवर आडवी बॅट मारली परंतु मी माझ्या परीने सर्वोतपरी प्रयत्न केल्याचं मोहित म्हणाला. तसं पाहायला गेलं तर फायनलमध्ये मोहित शर्मा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. या विकेट्स अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे आणि महेंद्र सिंह धोनी यांना त्याने माघारी पाठवलं होतं.

 

दरम्यान, 2015 साली वर्ल्डकपमध्ये मोहित शर्माचा समावेश होता. त्यानंतर तो गायब झाला तो थेट यंदाच्या सीझनमध्ये चांगला चर्चेत आला. मागील वर्षी गुजरातने त्याला नेट बॉलर म्हणून घेतलं होतं यंदा तोच नेट बॉलर फायनल ओव्हर टाकत होता. सामना हरला असला तरी मोहित शर्माचे पर्पेक्ट यॉर्कर कायम  सर्वांच्या स्मरणात राहतील.