IND vs AUS Odi Series | सीरिजदरम्यान वाईट बातमी, आयपीएलमधून हा खेळाडू आऊट

| Updated on: Mar 21, 2023 | 10:19 PM

आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या 10 संघांची प्रत्येकी 5 अशा प्रकारे 2 गटात विभागणी करण्यात आली आहे.

IND vs AUS  Odi Series | सीरिजदरम्यान वाईट बातमी, आयपीएलमधून हा खेळाडू आऊट
Follow us on

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे. तर त्यानंतर काही दिवसांनी बहुप्रतिक्षित आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या 16 पर्वाची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे. या आयपीएलआधी बरेचसे खेळाडू हे दुखापतीच्या जाळ्यात अडकले आहेत. तर काही खेळाडू हे दुखापतीमुळे स्पर्धेतील काही सामन्यांना मुकणार आहे. त्यात आता आणखी एका खेळाडूची भर पडली आहे.

पंजाब किंग्सच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे हा खेळाडू स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्स फ्रँचायजीने या खेळाडूला जवळपास 7 कोटी रुपयांची मोठी रक्कम मोजून ताफ्यात घेतलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडचा आक्रमक ओपनर बॅट्समन जॉनी बेअरस्टो हा आयपीएलच्या 16 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. पंजाब किंग्सने ऑक्शनमध्ये बेयरस्टोसाठी 6 कोटी 75 लाख रुपये खर्च केले.

बेयरस्टोला गेल्या वर्षी दुखापत झाली होती. त्यातून तो आता सावरतोय. द गार्डियन रिपोर्टनुसार, जॉनी बेयरस्टो आता आगामी एशेज सीरिजकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. इंग्लंडसाठी एशेज सीरिजही प्रतिष्ठेची असते. आपल्याकडे ज्या प्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा थरारपूर्ण असतो, अटीतटीचा असतो तितकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक चुरशीची ही एशेज सीरिज असते.

एशेज सीरिजला आयपीएलच्या 3 आठवड्यानंतर जून महिन्यात खेळवण्यात येणार आहे. बेयरस्टो याचा सप्टेंबर महिन्यात गोल्फ कोर्सवर अपघात झाला होता. यामध्ये त्याला कंबरेखालच्या भागात दुखापत झाली होती.

आयपीएल 2023 पंजाब किंग्स टीम

शिखर धवन (कॅप्टन), शाहरुख खान, जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषि धवन, लियम लिविंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा, राहुल चाहर, हरप्रीत बराड़, सॅम करन, सिकंदर रजा, हरप्रीत सिंह भाटिया, विध्वत कवेरप्पा, मोहित राठी आणि शिवम सिंह.