LSG IPL 2023 : ‘अरे, बघा जरा तो माणूस….’ सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर KL Rahul ने सोडलं मौन

| Updated on: May 17, 2023 | 12:33 PM

LSG IPL 2023 : KL Rahul ने ट्रोलिंगबद्दल त्याला काय वाटतं, ते स्पष्टपणे सांगितलं. 'द रणवीर शो' मध्ये बोलताना केएल राहुलने एक मोठी कबुली सुद्धा दिली. दुखापतीमुळे केएल राहुलला टुर्नामेंटच्या मध्यावर बाहेर पडाव लागलं.

LSG IPL 2023 : अरे, बघा जरा तो माणूस.... सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर KL Rahul ने सोडलं मौन
IPL 2023 KL Rahul
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने काल मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. दोन्ही टीम्ससाठी या सामन्यात विजय अत्यावश्यक होता. लखनऊची टीम नियमित कॅप्टन केएल राहुलशिवाय खेळत होती. IPL 2023 चा सीजन सुरु असताना केएल राहुलला दुखापत झाली. त्यामुळे तो टुर्नामेंटच्या मध्यावरच बाहेर पडला. केएल राहुल हा सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणारा, टीम इंडियाचा क्रिकेटपटू आहे, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. केएल राहुल खेळला नाही किंवा खेळला, तरी सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं.

त्याचे वेगवेगळे मीम्स व्हायरल होतात. सोशल मीडियावर चालणाऱ्या या ट्रोलिंगबद्दल अखेर केएल राहुल व्यक्त झाला आहे. त्याने ट्रोलिंगबद्दल त्याला काय वाटतं? या बद्दल स्पष्ट सांगितलं.

‘द रणवीर शो’ मध्ये राहुल काय म्हणाला?

केएल राहुलला त्याचा स्ट्राइक रेट, फॉर्म आणि कर्णधार पदावरुन ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावर सतत त्याची खिल्ली उडवली जाते. राहुल एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. ‘द रणवीर शो’ मध्ये बोलताना केएल राहुलने काही मुद्यांना स्पर्श केला. केएल राहुलने तो सोशल मीडिया ट्रोलिंगचा कशा पद्धतीने सामना करतो, त्याकडे कसं पाहतो, या बद्दल आपले विचार सांगितले.

‘दुसऱ्या मुलांवर सुद्धा याचा परिणाम होतो’

काही क्रिकेटर्स सोशल मीडिया ट्रोलिंगची अजिबात दखल घेत नाहीत. राहुलने ट्रोलिंगचा परिणाम होत असल्याची कबुली दिली. “ट्रोलिंगचा काही वेळा माझ्यावर परिणाम होतो. टीमच्या दुसऱ्या मुलांवर सुद्धा याचा परिणाम होतो. आम्हा क्रीडापटूंना तुमच्या पाठिंब्याची खूप गरज असते. आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार आहे, असं लोकांना वाटतं. तो माणूस कशातून चाललाय हे एकदा बघा” असं राहुल म्हणाला.

केएल राहुलवर अनेकदा बोचरी टीका

T20 वर्ल्ड कप 2022 नंतर नेटीझन्सनी सातत्याने केएल राहुलला टार्गेट केलय. त्याच्या फॉर्मवरुन त्याला सातत्याने टार्गेट केलं जातय. कोणाच्यातरी वशिल्यामुळे केएल राहुल टीममध्ये असल्याची त्याच्यावर सातत्याने टीका केली जाते. माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी परफॉर्मन्सच्या मुद्यावरुन केएल राहुलवर अनेकदा बोचरी टीका केली आहे.

‘मी माझ्या बाजूने 200 टक्के देतो’

केएल राहुल वर्ष 2022 मध्ये कुठल्याही फॉर्मेटमध्ये शतक झळकवू शकला नाही. त्याला टेस्ट, वनडे आणि टी 20 च्या उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. राहुलसाठी हा खडतर काळ आहे. “मी माझ्या बाजूने 200 टक्के देतो, पण अपेक्षित निकाल मिळत नाही” असं राहुलने कबूल केलं.

“आम्हाला कोणालाही वाईट खेळायचं नसतं. क्रिकेट हे आमचं आयुष्य आहे. क्रिकेटशिवया दुसर मला काही माहित नाही. मी तीच एक गोष्ट करतो” असं केएल राहुल म्हणाला.