IPL 2023 | आयपीएल दरम्यान वाईट बातमी, रोहित-विराट स्पर्धेतून माघार घेणार!

आयपीएल 16 वा सिजन ऐन रंगात आला असताना क्रिकेट चाहत्यांसाठी फार वाईट बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे स्पर्धेतून बाहेर पडू शकतात. जाणून घ्या नक्की कारण काय?

IPL 2023 | आयपीएल दरम्यान वाईट बातमी, रोहित-विराट स्पर्धेतून माघार घेणार!
| Updated on: Apr 24, 2023 | 5:26 PM

मुंबई | आयपीएल 16 वा मोसम ऐन रंगात आहे. क्रिकेट चाहत्यांना दररोज एकसेएक तोडीसतोड पैसावसूल सामने पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या हंगामातील बऱ्याच सामन्यांचा निकाल हा शेवटच्या बॉलवर लागलाय. या सिजनमध्ये आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान 6 सामने खेळले आहेत. रविवारी 23 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स टीमने कोलकाता नाईट रायडर्स संघावर 49 धावांनी विजय मिळवला. चेन्नई यासह या हंगामात सर्वात आधी 10 पॉइंट्स मिळवणारी पहिली टीम ठरली. दरम्यान दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. आरसीबी टीमचा विराट कोहली आणि मुंबई इंडियन्स पलटणचा कॅप्टन रोहित शर्मा हे दोघे आयपीएल स्पर्धेतून मध्येच माघार घेऊ शकतात.

नक्की कारण काय?

आयपीएलचा 16 वा मोसम पार पडल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप फायनल खेळणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन हे इंग्लंडमधील द ओव्हल ग्राउंडवर करण्यात आलंय. हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान पार पडणार आहे. तसेच पावसाने घात केल्यास खेळ बिघडू नये, यासाठी 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी काही दिवसांपूर्वीच संघ जाही केला आहे. तर शिवसुंदर देसाई यांच्या नेतृत्वातील निवड समिती टीम इंडियाचा संघ जाहीर करणार आहे.

“टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड, आणि खेळाडू 23 किंवा 24 मे पर्यंत लंडनसाठी रवाना होऊ शकतात. राहलु द्रविड मे महिन्याच्या अखेरच्या आवड्यात 23-24 तारखेदरम्यान लंडनला निघतील. तर काही खेळाडू आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियासोबत जोडले जातील. काही कसोटी खेळाडू हे द्रविडसह जातील, कारण त्यांचं तोवर आयपीएल अभियान संपलेलं असेल.”, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला दिली.

तसेच जर मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांचं आव्हान प्लेऑफआधीच संपुष्टात आलं, तर द्रविडसोबत जाणाऱ्या यादीत विराट आणि रोहित यांचाही समावेश असू शकतो. आयपीएल फायनल 28 मे रोजी खेळण्यात येणार आहे. तर त्याआधी प्लेऑफ आणि एलिमिनेटर पार पडणार आहे.

अजिंक्य रहाणे याला सुवर्णसंधी

अजिंक्य रहाणे याला डब्लूटीसी फायनलमध्ये स्थान मिळवत टीम इंडियात कमबॅक करण्याची सुवर्णसंधी आहे. श्रेयस अय्यर याला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. तर सूर्यकुमार यादव याला कसोटी त्यातही इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे निवड समिती रहाणे याचा संधी देऊ शकते.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.