IPL 2023 : SRH vs DC | दिल्ली कॅपिटल्स संघाचा थरारक विजय, 7 धावांनी हैदराबादवर मात

IPL 2023 SRH vs DC Marathi : दिल्ली कॅपिटल्स संघाने सनराइजर्स हैदराबाद संघावर 7 धावांनी थरारक विजय मिळवला आहे.

IPL 2023 : SRH vs DC | दिल्ली कॅपिटल्स संघाचा थरारक विजय, 7 धावांनी हैदराबादवर मात
| Updated on: Apr 24, 2023 | 11:39 PM

मुंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील अटीतटीच्या सामन्यामध्ये दिल्ली संघाने सात धावांनी विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला हैदराबादच्या गोलंदाजांनी 144 धावांच्या आत रोखलं होतं. मात्र हैदराबादच्या संघाला निर्धारित 20 षटकात 137 धावा करू शकला. हैदराबाद सामना सहज जिंकेल असं वाटत होतं मात्र दिल्लीने हार न मानता जिद्दीने खेळ करत सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळवलाय.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम (C), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (W), मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), फिलिप सॉल्ट (W), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा