
आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं होतं. त्यामुळे या सामन्यातून चेन्नई सुपर किंग्सला वचपा काढण्याची संधी आहे. तर चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत टॉप चारमध्ये एन्ट्री घेण्यास लखनौ सुपर जायंट्स संघ उत्सुक आहे. चेपॉकमधील खेळपट्टी फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. खेळपट्टी तुलनेने कमी उसळी असल्याने फटकेबाजी करताना अडचण येऊ शकते. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दव फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून कर्णधार केएल राहुल याने हा निर्णय घेतला. केएल राहुलने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. थोडं दव आहे, आम्ही इथे प्रशिक्षण घेतलंय आणि थोडंसं दव असल्याचा प्रभाव पडेल. विकेट थोडी संथ आहे आणि आशा आहे की आम्ही त्यांच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवू शकतो. आम्ही तिन्ही पैलूंमध्ये चांगलं खेळलो, परंतु आम्ही लखनौमध्ये निकाल सोडला आहे. आम्हाला माहित आहे की चेन्नईत आव्हानात्मक आहे, प्रत्येकजण त्यांचा सपोर्ट करेल. गर्दीला शांत करण्याची गरज नाही, ते नेहमीच चांगल्या क्रिकेटला प्रोत्साहन देतात.आज आम्ही त्याच संघासह खेळणार आहोत.”
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितलं की, ” वेगळे काही नाही, पण नाणे टॉस ही एक गोष्ट आहे ज्यावर मला काम करण्याची गरज आहे. नंतर थोडे दव पडेल, पण विकेट तुम्हाला कसे आश्चर्यचकित करेल हे तुम्हाला कधीच कळणार नाही. तुम्हाला फक्त तिथून बाहेर जाऊन स्वतःला व्यक्त करण्याची गरज आहे. आमच्यासाठी संघात एक बदल आहे. रचिन ऐवजी डॅरिल संघात आहे. तीन सामने घरच्या मैदानात खेळणे खूप चांगले आहे, परंतु त्यासाठी आम्हाला काही नाणेफेक जिंकणे आवश्यक आहे. पण तुम्ही प्रथम फलंदाजी करत असाल की प्रथम गोलंदाजी याने काही फरक पडत नाही, जिंकण्यासाठी तुम्हाला येथे चांगले क्रिकेट खेळावे लागेल.”
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.