AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 गुजराती आपल्याला गिळायला निघाले आहेत, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप, थेट म्हणाले…

राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर जोरदार आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट मोठा आरोप केला आहे.

2 गुजराती आपल्याला गिळायला निघाले आहेत, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप, थेट म्हणाले...
Uddhav Thackeray
| Updated on: Dec 28, 2025 | 1:20 PM
Share

राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागेल. राज्यातील निवडणुका शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार आहेत. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार आहेत. हेच नाही तर राज ठाकरे यांनी जाहीर केले की, मुंबई महापालिकेवर मराठीच माणूस महापाैर होईल आणि तोही आमचाच असा दावा केला. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार शेवटी त्यांनी युती जाहीर केली. नुकताच उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान मोठा दावा करत म्हटले की, भाजपाला कोणीही ओळखत नव्हते. आम्ही भाजपाला खेडोपाडी नेले.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही ज्यांना मोठे केले आज तेच आमच्यावर वार करत आहेत. 2 गुजराती आपल्याला गिळायला निघाले आहेत. इतकी वर्ष लढाई लढलो मुंबई कोणीही आमच्यापासून हिसकावू शकत नाही. आजपर्यंत भाजपाने उपयोग करून घेतला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेले असताना आपण जर तुझं माझं करत बसलो तर माझं म्हणणं आहे की, लढाई न लढलेले बरं.

मला तुमच्यापैकी एकही माणूस फुटता कामा नये. तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा आणि तुमच्यापैकी समोरील फक्त चार माणसे निवडून दाखवा. मी वाईटपणा घेतोच की, मी सर्व विभागप्रमुखांना सांगतो की, मी वाईटपणा घेतो… तुम्ही नका घेऊ. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका. भाजपाने फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघाले आहेत.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आजपर्यंत तर भारतीय जनता पार्टीने आपला दुरूपयोग केला आहे. आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी मनसेसोबत युती केली. मला माहिती आहे की, ज्यावेळी युती असते आघाडी असते त्यावेळी 100 टक्के आपल्या मनासारखे होत नाही. ना शंभर टक्के त्यांच्या मनासारखे होत.. ना आणखीन तिसरा पक्ष असेल तर त्यांच्या मनासारखे होत.. काही जागा आपल्या हक्काच्या असतात पण नायलाजाने सोडाव्या लागतात, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.