मोठी बातमी ! शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली, बडा नेता लागला गळाला, थेट पक्षप्रवेश
BMC Election : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. एका माजी नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेतली आहे.

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक नेते बैठका घेऊन रणनीती आखत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. एका माजी नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेतली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. हा नेता कोण आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चंगेज मुलतानी यांचा ठाकरे गटात प्रवेश
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे, अशातच आता जोगेश्वरी पश्चिम येथील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार हारुन खान, वर्सोवा विधानसभा समन्वयक बाळा आंबेरकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
जोगेश्वरी पश्चिम भागात उद्धव ठाकरेंची ताकद वाढली
चंगेज मुलतानी यांच्या पक्षप्रवेशामुळे जोगेश्वरी पश्चिम भागात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. 2017 च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 62 मधून मुलतानी यांनी अपक्ष विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या राजू श्रीपाद पेडेनेकर यांचा पराभव केला होता. मात्र आता त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे बळ वाढले आहे.
जोगेश्वरी पश्चिम येथील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी आमदार हारुन खान, वर्सोवा… pic.twitter.com/3ajmFp49S7
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 26, 2025
16 जानेवारीला निकाल जाहीर होणार
दरम्यान, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सध्या उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. यासाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तसेच 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. काही काळापूर्वी हे दोन्ही नेते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, मात्र आता त्यांनी मराठी मानसाच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्ष शिवसेना-भाजपच्या महायुतीशी लढणार आहेत. त्यामुळे आता मतदार कुणाच्या गळ्यात मुंबई महापालिकेच्या सत्तेची माळ टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
