IPL 2024, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानसमोर ठेवलं 222 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 षटकात 8 गडी गमवून 221 धावा केल्या. आता हे आव्हान राजस्थान रॉयल्स गाठणार का? याकडे लक्ष आहे.

IPL 2024, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानसमोर ठेवलं 222 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 07, 2024 | 9:19 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने साजेशी कामगिरी केली. प्रथम फलंदाजीचं मिळाल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याचं लक्ष्य होतं. फलंदाजांनी हे लक्ष्य गाठून दिलं आहे. आता गोलंदाजंना आपली भूमिका चोखपणे बजवावी लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 221 धावा केल्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं आहे. आता राजस्थान रॉयल्स दिलेलं आव्हान गाठणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दिल्ली कॅपिटल्सला जेक फ्रेझर मॅकगुर्क आणि अभिषेक पोरेल यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी करून दिली. जेक फ्रेझर 50 धावा करून बाद झाला. आर अश्विनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला शाई होप काहीच करू शकला नाही. रनआऊट होत तंबूत परतला. त्यानंतर अक्षर पटेलने अभिषेक पोरेलसोबत चांगली भागीदारी केली. अभिषेकने 36 चेंडूत 65 धावा केल्या. अश्विनने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं.

अक्षर पटेलला तग धरण्याच्या आतच तंबूत पाठवलं. 15 धावांवर असताना त्याला अश्विनने बाद केलं. ऋषभ पंत या सामन्यात काही खास करू शकला नाही. 15 धावांवर त्याचा डाव आटोपला. युझवेंद्र चहलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. गुलबदीन नायबने चांगली फटकेबाजी केली. 15 चेंडूत 19 धावा केल्या आणि बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानतर ट्रिस्टन स्टब्सने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. 20 चेंडूत 41 धावा केल्या. मात्र त्याला तंबूत पाठवण्यात संदीप शर्माला यश आलं. राजस्थान रॉयल्सकडून आर अश्विनने 3, ट्रेंट बोल्टने 1, संदीप शर्माने 1 आणि युझवेंद्र चहलने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद