IPL 2024 : कॅप्टन श्रेयसला पराभवानंतर जबरी झटका, नक्की काय झालं?

IPL 2024 KKR vs RR : कोलकाता नाईट रायडर्सला मंगळवारी 16 एप्रिल रोजी 223 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. राजस्थानने कोलकातावर विजय मिळवला. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर याला पराभवानंतर आणखी एक फटका बसला आहे.

IPL 2024 : कॅप्टन श्रेयसला पराभवानंतर जबरी झटका, नक्की काय झालं?
Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 5:30 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला 223 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. राजस्थान रॉयल्सने कोलकाता विरुद्ध 224 धावांचं आव्हान हे शेवटच्या बॉलवर 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कोलकाताकडून पहिल्या डावात सुनील नरीन याने पहिलंवहिलं शतक झळकावलं. नरीनच्या 109 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 223 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर जॉस बटलर याने नाबाद 107 धावांची शतकी खेळी करुन राजस्थानला विजयी करुन दिलं. श्रेयस अय्यर याच्या नेतृ्त्वात कोलकाता हा 223 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. श्रेयसला पराभवानंतर आणखी एक जबर फटका बसला आहे.

सामन्यादरम्यान कॅप्टन श्रेयस अय्यरकडून मोठी चूक झाली.त्यामुळे श्रेयसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. श्रेयस कॅप्टन म्हणून ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी ठरला. त्यामुळे श्रेयसला 12 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. नियमांनुसार प्रत्येक सामन्यात एका तासात अपेक्षित षटकांचा खेळ होणं अपेक्षित असतं. श्रेयस अय्यर यात अपेक्षित ठरला. त्यामुळे श्रेयसवर ही कारवाई करण्यात आली. आयपीएलच्या 17 व्या मोसमात स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई झालेला श्रेयस चौथा कर्णधार ठरला.

श्रेयसच्या आधी गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या तिन्ही संघांच्या कर्णधारांवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कॅप्टन शुबमन गिल, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना 12 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय. इतकंच नाही, तर ओव्हर रेट राखण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधारांमध्ये एकही विदेशी कर्णधार नाही. यावरुन विदेशी कर्णधार हे सजग असल्याचं स्पष्ट होतं. तसेच या चारही कर्णधारांची ही चौथी वेळ होती. आता या चौघांपैकी कुणाकडूनही पुन्हा तशीच चूक झाली, तर त्यांना दंड म्हणून 24 लाख रुपये मोजावे लागतील.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.